Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

तुमच्या मुलांचे राजकीय भविष्य घडवण्यासाठी मराठी मुलाचा बळी घेणार का ?... चित्रा वाघ यांचा ठाकरे बंधूना सवाल

                          ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

लोकल ट्रेनमध्ये मराठी हिंदी वादातून कल्याण पूर्वेतील अर्णव खैरे या विद्यार्थ्याने आत्महत्या केली असून, या घटनेनंतर सर्वच स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याप्रकरणी भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आज कल्याण पूर्वेत येऊन खैरे कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले. अर्णव हा भाषा वादाचा बळी ठरला असून तुमच्या मुलांचे राजकीय भविष्य घडवण्यासाठी मराठी मुलाचा बळी घेणार का ? असा सवाल  चित्रा वाघ यांनी ठाकरे बंधूंना केला आहे.

यावेळी चित्रा वाघ यांनी बोलतांना सांगितले कि, फक्त हिंदीचे एक वाक्य बोलला म्हणून त्याला मारहाण केली त्या धक्क्यातून त्याने आत्महत्या केली. भाषा संवादाचे साधन की विवादाचे साधन हा प्रश्न आहे.  अर्णव हा हुशार मुलगा होता त्याचा बळी घेतलाकाय मिळवलं हे करूनत्या मुलाची काय अवस्था केलीत्याची काय चूक होती, याची कोण जबाबदारी घेणार असा सवाल करत काही नेत्यांनी त्यांच्या अस्तित्वासाठी त्यांचं राजकीय भवितव्य घडवण्यासाठी जे विष पेरलं त्याचा पहिला बळी अर्णव खैरे ठरला आहे.

भाषा भाषांमध्ये लढवायच जे काम आहे त्यातून एका मुलाचा बळी गेला. कथित नेत्यांचे मुलं पार्ट्यांमध्ये जातात तेव्हा मराठी बोलतात का. मराठी भाषेचा अभिमान मात्र दुसऱ्या भाषेचा द्वेष का करता. तो मराठी मुलगा होता. मारणारे मराठी होते यातून काय साध्य केलं. ज्या परिवाराने मुलाला गमावले त्याची आई वडीलांची अवस्था बघा. एखाद्याचा जीव घेऊन मराठी अस्मिता वाढवणार का. भाषेवरचं असुरी प्रेम थांबवा, आता तरी सुधरा असा सल्ला दिला.

ज्यांनी अर्णवला मारलं त्याचा बळी घेतला त्यांना पोलीस शोधतील. तुमच्या मुलांच्या राजकीय भविष्य घडवण्यासाठी मराठी मुलाचा बळी घेणार का  असा सवाल करत भाषेचं विष पेरायचं काम करतायत, भाषेवरच असुरी प्रेम थांबवलं पाहिजे. येणाऱ्या दिवसात राज्याचे मुख्यमंत्री निश्चित यांवर कारवाई करतील असे चित्र वाघ यांनी सांगितले. 


Post a Comment

0 Comments