Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अल्पवयीन मुलांना वाम मार्गाला लावणाऱ्या कल्याण पूर्वेतील गेम झोन वर पोलिसांची कारवाई...तीन जणांना केली अटक


                 ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 
 "जॉयस्टिक जंगल" गेम झोनच्या नावाने  या नावाने सुरू असलेल्या गाळ्यात कोळसेवाडी पोलिसांनी छापेमारी करत गेमिंग झोनच्या मालकासह तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणी अल्पवयीन मुलांना वाम मार्गाला लावण्याचा गोरखधंदा सुरू असल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करीत तिघांना अटक केली आहे. पृथ्वीराज राजा चव्हाण( वय 27, गेम झोनचा मालक ), श्रीराम राजा चव्हाण (वय 25, चालक) आणि अमित उदाराम सोनवणे (वय 20 ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

कल्याण पूर्वेतील चिंचपाडा रोडवर डॉमिनोझच्या शेजारी एका बिल्डिंगच्या गाळ्यामध्ये "जॉयस्टिक जंगल" या नावाने सुरू असलेल्या गेमझोनमध्ये कोणत्याही प्रकारची सुरक्षिततेच्या उपाययोजना किंवा नियमांचे पालन न करता सदर ठिकाणी अल्पवयीन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असून, त्यांना वाम मार्गाने लावण्याचा व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक (गुन्हे) गणेश नहायदे, सपोनि दर्शन पाटील  यांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे 25 नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास अचानक पोलीस पथकान छापेमारी केली. त्यावेळी "जॉयस्टिक जंगल" या गेमझोनच्या गाळ्यामध्ये 18 वर्षे वयाखालील अल्पवयीन मुले-मुली हे 8 कॉम्युटरवर गेम खेळत असताना दिसून आले. खळबळजनक बाब म्हणजे या गेमझोनमध्ये ग्राऊंड फ्लोअरला एक बंद प्रायव्हेट रूम होता आणि त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची लाईटची व्यवस्था, व्हेन्टिलेशनची व्यवस्था, फायर सुरक्षा उपकरण, सीसीटीव्ही कॅमेरे इत्यादी उपाययोजना केल्याचे आढळून आले नाही.

या सर्व गंभीर बाबी समोर आल्यानंतर गेम झोनचे मालक पृथ्वीराज राजा चव्हाण, श्रीराम राजा चव्हाण, अमित उदाराम सोनवणे या तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 125, 3(5) सह म. पो. का. 131,133 अन्वये गुन्हा नोंद करून तिघांना अटक करण्यात आलेली असून, सदर गुन्ह्याचा तपास सुरू असल्याची माहिती डीसीपी अतुल झेंडे यांनी दिली आहे. 

दरम्यान, अटी आणि शर्तीचे उल्लंघन करणाऱ्या गेमिंग झोनवर कारवाई सुरू राहणार आहे. तसेच पालकांनीसुद्धा याबाबत सतर्क राहून मुलांवर विशेष लक्ष ठेवणे आवश्यक आहे, असे आवाहनही डीसीपी अतुल झेंडे यांनी पालकांना केलंय.

Post a Comment

0 Comments