ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली वार्ताहर
डोंबिवली पूर्वेतील नांदिवलीपाडा परिसरातील संघवी गार्डन येथील अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यासाठी शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आणि आमदार राजेश मोरे यांच्या प्रयत्नांनी निधी मंजूर झाला,त्याअनुषंगाने सदर कामाचे भूमिपूजन संघवी गार्डन येथे शेकडो रहिवाशांच्या उपस्थितीत आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.त्या प्रसंगी प्रभागातील शिवसेनेच्या माजी नगरसेविका सौ. प्रेमा प्रकाश म्हात्रे,माजी जिल्हा परिषद सदस्य श्री प्रकाश म्हात्रे यांच्या सह श्री.अर्जुन पाटील,श्री.उमेश पाटील,श्री विकास देसले,श्री अनिल म्हात्रे,श्री.नितीन माळी आणि शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा भूमिपूजन सोहळा पार पडला.ह्या प्रसंगी माजी नगर सेविका सौ प्रेमा म्हात्रे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आमदार राजेश मोरे यांचे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले.
त्या प्रसंगी राजेश मोरे यांनी "आपल्या मतदार संघात विविध प्रकारचे विकास कामे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने सुरू झाली आहे, आणि नागरिकांना कोणत्याही प्रकारची सुविधा कमी पडू दिली जाणार नाही"असे आश्वासन दिले.
.jpg)


Post a Comment
0 Comments