Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

टिटवाळ्यातील भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे राजीनामे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश

  

                 ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण डोंबिवली महानगरपालिका मांडा–टिटवाळा परिसरात . पॅनल क्र. ३ मधील मांडा टिटवाळा विभागातील गेल्या ५२ वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ता राहिलेले माजी नगरसेवक सुरेश बळीराम भोईर यांनी १९७३ मध्ये जनसंघातून राजकीय प्रवासास सुरुवात केली. २००० ते २००५ या कार्यकाळात नगरसेवक म्हणून त्यांनी प्रभागात उल्लेखनीय विकासकामे केली. परंतु स्थानिक पातळीवरील पक्षांतर्गत राजकारण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) आणि राष्ट्रवादी पार्टी (अजित पवार गट) पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या काळात भारतीय जनता पार्टी पक्षांमध्ये प्रवेश देऊन सक्रिय पदाधिकाऱ्यांवर अन्याय केल्यामुळे  त्यांनी सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.


     "शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे" यांच्या दृढ नेतृत्वावर अटल विश्वास, उपनेते विजय साळवी, जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर आणि विधानसभा संघटक किशोर शुक्ला यांच्या कार्यक्षम, पारदर्शक आणि विकासाभिमुख कार्यपद्धतीने प्रेरित होऊन, मांडा–टिटवाळा विभागाचा कायापालट करण्याच्या महान ध्येयाने... भारतीय जनता पार्टीचा निरोप घेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला आहे." ..  ....सुरेश बळीराम भोईर (ज्येष्ठ माजी नगरसेवक व महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य)  



सुरेश बळीराम भोईर यांच्या सोबत प्रदीप भोईर (भाजपा ठाणे जिल्हा सचिव), हनुमान भोईर ज्येष्ठ पदाधिकारी, प्रतीक संतोष भोईर  (अध्यक्ष व्यापारी मंडळ ), अक्षय भोय  ...(युवा नेतृत्व) तसेच अनेक पदाधिकारी, महिला आघाडी आणि ज्येष्ठ नागरिकांसह शेकडो समर्पित कार्यकर्ते समर्थकांनी आज शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षात सामूहिक प्रवेशामुळे मांडा - टिटवाळा विभागात भाजपाला मोठा धक्का बसला असल्याचे दिसून येत आहे.


Post a Comment

0 Comments