ब्लॅक अँड व्हाईट बदलापूर वार्ताहर
बदलापूर नगरपरिषदेची निवडणूक चांगलीच चुरशीची होणार असल्याचे दिसते आहे.४९ जागांसाठी एकूण १६१ उमेदवार रिंगणात आहेत, तर नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवार आमनेसामने आहेत. बदलापूर निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत असलेली बाब म्हणजे महायुतीमधीलच 'आंतरयुती' लढत होय. एका बाजूला शिवसेना (शिंदे गट) आणि दुसऱ्या बाजूला भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार गट) युती या दोन घटक पक्षांमध्ये थेट सामना रंगणार आहे.
एकूण ४९ जागांपैकी २१ जागांवर शिवसेना शिंदे गट विरुद्ध भाजप - राष्ट्रवादी युती अशी सरळ टक्कर आहे. या प्रभागांमध्ये दोन्ही गटांचे दिग्गज उमेदवार समोरासमोर आल्याने निवडणुकीची चुरस चांगलीच वाढली आहे.
कुळगाव-बदलापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपा,राष्ट्रवादी,आणि आर. पी आय.आठवले युतीचे प्रभाग 15 मध्ये अधिकृत उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक 15 अ साठी अँड.भाविता हर्षल घोरपडे, प्रभाग क्रमांक 15 ब साठी सौ.हर्षदा उमेश पवार,आणि 15 क्रमांक, क साठी श्री.आदित्य नारायण पाटील या उमेदवारांनी आपल्या प्रभागात जोरदार प्रचार सुरू केला आहे.त्यातीलच प्रभाग क्रमांक 15 ब साठी धडाडीच्या सुशिक्षित उमेदवार म्हणून हर्षदा उमेश पवार यांना नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
कुळगाव बदलापूर नगर परिषद निवडणूकिसाठी प्रभाग 15 अ मध्ये उमेदवार हर्षदा उमेश पवार आणि समाजसेवक उमेश पवार गेली अनेक वर्षे नागरिकांच्या विविध समस्या निश्चयाने सोडवत आले आहेत. धडाडीच्या आणि लोकाभिमुख कार्यकर्त्या म्हणून सौ.हर्षदा उमेश पवार प्रभागात विशेष चर्चेत आहेत.
आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी अनेक समाजोपयोगी कामे हाती घेत प्रभागाच्या विकासाला नवी दिशा देण्याचे काम केले आहे. विशेषतः प्रभागातील पाण्याच्या समस्येवर ते स्वतःच्या खर्चातून उपाय योजना करीत आहेत, ही बाब नागरिकांमध्ये प्रशंसनीय ठरली आहे.
प्रभागातील रस्त्यांवर काही ठिकाणी एलईडी लाईट्स स्वखर्चाने बसवून त्यांनी प्रकाश व्यवस्था सुधारली. तसेच कॅन्सरग्रस्त रुग्णांना दर महिन्याला वैद्यकीय आणि आर्थिक मदत, महिलांना गृहउद्योगासाठी विशेष आर्थिक सहाय्य, अशा सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमांमुळे त्यांची ओळख समाजाभिमुख कार्यकर्त्यांची बनली आहे.
उमेश पवार आणि हर्षदा पवार यांचे हे सातत्यपूर्ण कार्य नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण करणारे असून आगामी निवडणुकीत त्यांना मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
कुळगाव बदलापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 पार्श्वभूमीवर प्रभागात उमेदवार हर्षदा उमेश पवार आणि समाजसेवक उमेश पवार हे नाव व्यापक चर्चेत आहे. अनेक वर्षांपासून नागरिकांच्या समस्या मनापासून ऐकून घेत त्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे, धडाडीचे व लोकाभिमुख कार्यकर्ते म्हणून त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
गेल्या काही वर्षांत आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पवार दाम्पत्याने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत. प्रभागात त्रासदायक ठरलेल्या पाणीपुरवठ्याच्या समस्यांवर त्यांनी स्वतःच्या खर्चातून उपाययोजना करून दिलासा दिला, ही त्यांच्या समाजसेवेची मोठी नोंद आहे.
स्वच्छतेसाठी विशेष मोहीम राबवून, काही भागात स्वखर्चाने एलईडी लाईट्स बसवून परिसर उजळवण्याचे काम त्यांनी केले. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील कॅन्सरग्रस्त रुग्णांना ते दर महिन्याला आर्थिक मदत देतात, महिलांना गृहउद्योगासाठी भांडवल सहाय्य उपलब्ध करून देतात, हे त्यांचे सामाजिक बांधिलकीचे कार्य उल्लेखनीय ठरले आहे.
उमेश पवार यांची प्रामाणिक सेवा, नागरिकांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते, आणि हर्षदा पवार यांचे महिलांसाठीचे उपक्रम यामुळे प्रभागात त्यांना मोठा जनसमर्थन मिळत आहे. निवडणूक 2025 मध्ये त्यांच्या नावाभोवती उत्साह आणि अपेक्षांचे वातावरण दिसून येतआहे.
महिलांना स्वावलंबी करण्यासाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण, युवकांसाठी मार्गदर्शन शिबिरे, वरिष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी मोफत वैद्यकीय तपासणी, तसेच समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दिलेल्या मदतीमुळे या उमेदवाराने प्रभागात विश्वासाचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या कार्यशैलीत पारदर्शकता, तत्परता आणि नागरिकांच्या अडचणींवरील संवेदनशील दृष्टिकोन नेहमीच दिसून येतो.
प्रभागात स्वखर्चातून एलईडी लाईट्स बसवणे, गटार दुरुस्ती, पाण्याच्या टँकरची व्यवस्था करणे, तसेच अनेक ठिकाणी स्वच्छता मोहिम राबवणे — अशा अनेक कामांमुळे प्रभागातील नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल एक विशेष विश्वास निर्माण झाला आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी सातत्याने नगरपरिषदेकडे पाठपुरावा केला असून यामुळे अनेक कामांना गती मिळाली आहे.
प्रभाग क्रमांक 15 मध्ये समाजकार्याची नाळ जपणारे, नागरिकांच्या हाकेला तत्काळ धावून जाणारे आणि संबंध जोडणारे हे उमेदवार निवडणुकीत प्रबळ दावेदार ठरत आहेत.
.jpg)





Post a Comment
0 Comments