महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांसोबत चर्चेनंतर सकारात्मक प्रतिसाद
प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे आश्वासन
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण पूर्व भागातील लाखो रहिवाशांसाठी आरोग्य सुविधांचा अभाव हा गंभीर समस्या बनला असून, या मुद्द्यावर माजी नगरसेवक उदय रसाळ यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली. या भागातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना करदात्या नागरिकांना मोफत X-रे, एमआरआय स्कॅन, सोनोग्राफी आणि लॅब टेस्टसारख्या मूलभूत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रसाळ यांनी ठाम भूमिका घेतली आहे.
अशा मोफत आरोग्य सुविधा देण्यात महापालिकेच्या बजेटमधील अडचणी, धोरनात्मक निर्णय आवश्यक असतात हे लक्षात घेता, कल्याण-डोंबिवलीतील मोठ्या कंपन्यांच्या सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) फंडाचा वापर करून ही योजना राबवण्याचा प्रयत्न करावा असा प्रस्ताव मांडण्यात आला असून, पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांनी याबाबत सकारात्मक होकार दिला आहे.
कल्याण पूर्वेच्या गीता हरकिसनदास दलाल या महापालिका रुग्णालयात किंवा नवीन आरोग्य केंद्रात या सुविधा मोफत उपलब्ध करणे हे महानगरपालिकेचे प्राथमिक कर्तव्य असल्याचे रसाळ यांनी सांगितले. चर्चेदरम्यान डॉ. दीपा शुक्ला यांनी सांगितले की, सध्या बजेटमध्ये अशी तरतूद नसल्याने सर्वांसाठी मोफत सुविधा देणे शक्य नसले तरी हा धोरणात्मक निर्णय पालिका आणि शासन स्तरावर घेतला जाईल.
.jpg)

Post a Comment
0 Comments