115 किलो गांजा सह 13 आरोपींना
अटक, चार आरोपींचा शोध सुरू
पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या
मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यात
पहिल्यांदाच कारवाई
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलिसांनी तब्बल 17 ड्रग्स तस्करांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. विशेष म्हणजे ठाणे जिल्हातील हि पहिली कारवाई आहे. विशाखापट्टणम ते कल्याण असा पसरलेला अमली पदार्थ तस्करीचे मोठे रॅकेट उध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी गांजा, वाहने, पिस्तूल, वॉकी-टॉकीसह तब्बल 70 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीविरोधात महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पुणे तसेच तेलंगणा राज्यातही अनेक गुन्हे नोंद आहेत. कल्याण जवळील बल्यानी येथे राहणारा गुफारान शेख हा या टोळीचा म्होरक्या राहत होता. खडकपाडा पोलिसांनी गुफारान शेखसह टोळीतील तब्बल 17 जणांविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.
खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये अंमली पदार्थ विरोधी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयात पोलीस उप आयुक्त यांच्या विषेश कार्यवाही पथकाकडुन तपास करण्यात आला. उपायुक्त अतुल झेंडे यांच्या सूचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे, खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर वाघमोडे, पोलीस उपायुक्त पथकातील अधिकारी अनिल गायकवाड यांच्या पथकाने या रॅकेटचा तपास सुरू केला. या तपासात राज्यात्तील तसेच राज्याबाहेरील विवीध भागातुन एकुण १३ आरोपींना अटक करण्यात आली असुन त्यामध्ये विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश येथुन आरोपींच्या ताब्यातुन एकुण ६२ किलो ग्रॅम वजनाचा गांजा, १ पिस्टल, २ जिवंत काडतुस व २ वॉकीटॉक संच चार्जरसह असे पंचनाम्यांतर्गतजप्त करण्यात आले. अटक केलेल्या १३ आरोपींच्या ताब्यातुन एकुण ११५ किलोग्रॅम गांजासह सुमारे ७० लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या गुन्हयातील आरोपी आर्थीक लाभासाठी संघटीत गुन्हेगारी करत असल्याचे निष्पन्न झाल्याने ठाणे पोलीस आयुक्तालयात नमुद गुन्हयातील १७ आरोपींविरुद्ध मोक्का प्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे. गुफरान हन्नान शेख हा सदर टोळीचा टोळी प्रमुख असुन, त्याचे इतर १६ साथीदार या गुन्हयात सहभागी आहे. या आरोपींमध्ये गुफरान शेख, बाबर शेख, सुनिल राठोड, आझाद शेख, रेश्मा शेख, शुभम उर्फ सोन्या भंडारी, असिफ शेख, सोनु सय्यद, प्रथमेश नलवडे, रितेश गायकवाड, अंबादास खामकर, आकाश भिताडे, योगेश जोध यासह इतर आणखी ४ आरोपींचा यामध्ये समावेश आहे.
हि कारवाई अपर पोलीस आयुक्त संजय जाधव याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप आयुक्त अतुल झेडे यांच्या सुचनेप्रमाणे करण्यात आली असुन या गुन्हयाचा पुढील तपास सहा पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे हे करत आहेत.
.jpg)




Post a Comment
0 Comments