Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अनियमित, दूषित पाणी पुरवठ्याच्या निषेधार्थ नागरिकांचा "मटका" मोर्चा पाणी समस्या सोडवा अन्यथा खडकपाड्याला रास्तारोको करण्याचा दिला इशारा

   

खडकपाडा भगवान नगर एव्हरेस्ट नगर

परिसरात अनियमित, दूषित पाणी पुरवठा


                 ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

 कल्याण पश्चिमेतील खडकपाडा, भगवान नगर, एव्हरेस्ट नगर परिसरात अनियमित, दूषित पाणी पुरवठा होत असून पाणी समस्येने त्रस्त नागरिकांनी केडीएमसी मुख्यालयावर मटका मोर्चा काढत मटका फोडो आंदोलन  केले. गेल्या वर्षभरापासून याभागात पाणी समस्या भेडसावत असून केडीएमसी प्रशासनाकडे पाठपुरावा करून देखील पाणी समस्या सुटत नसल्याने आज हा मोर्चा काढला असून, लवकरात लवकर पाणी समस्या न सोडवल्यास खडकपाडा येथे रास्तारोको करण्याचा इशारा माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांनी दिला आहे.  


  

कल्याण पश्चिम येथील बेतुरकरपाडा विभाग क्र. २३ व २७ मधील भगवाननगर व एव्हरेस्ट नगर परिसरात गेली एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून अत्यंत कमी दाबाचा व दुषित पाणी पुरवठा होत आहे. याबबत वारंवार तक्रार करण्यात आली आहे. यापूर्वीही "पाणी मोर्चा" काढण्यात आला होता. तेव्हा ४ ते ५ दिवस पुरेसे पाणी देण्यात आले. त्यानंतर पुन्हा तीच समस्याप्रत्येकवेळी लवकरच सुधारणा करण्यात येईलदोन चार ठिकाणी खड्डे भरून दुरुस्तीचे काम सुरु असल्याचा भास निर्माण केला जात आहे.  या सर्व - गैरप्रकारामुळे त्रस्त महिलांनी आज केडीएमसी मुख्यालयावर  उत्फूर्तपणे मटका  मोर्चा आणला. यावेळी या महिलांनी केडीएमसीच्या मुख्यालयाबाहेर मटके फोडत केडीएमसीचा निषेध व्यक्त केला. यानंतरही समस्या सुटली नाही तर खडकपाडा चौकात महिलांचे आंदोलन होईल व रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांनी दिला आहे. 

ह्या मोर्च्यात  महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या,त्यात उषाताई गोरे, शारदाताई, सुनंदा पाटील,विभावरी विचारे, माधुरी ठाकरे, सुषमा सावंत, शांताराम आंब्रे ,विष्णू चव्हाण, भिकाजी सुर्वे, मोहन वाडेकर, आनंद तोरणे, गोरक्ष साबळे, जनार्दन मुळे, विक्रम जगताप आदी रहिवाशांनी सहभाग घेतला.



Post a Comment

0 Comments