ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेता भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात पॅनल निहाय संघटनात्मक बैठका तसेच इच्छुक पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन भारतीय जनता पार्टी स्वबळावर महानगरपालिका निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या बरोबर माजी आमदार नरेंद्र पवार, माजी शहर अध्यक्ष वरुण पाटील, प्रेमनाथ म्हात्रे, तसेच सर्व मंडळ अध्यक्ष,माजी नगरसेवक यांच्या उपस्थितीत पॅनल निहाय सभांचा धडाका सुरू आहे.
या बैठकीत भाजपचे सर्व जेष्ठ पदाधिकारी, व लोकप्रतिनिधी यांनी देखील एक सुराने स्वबळावर निवडणूक लढण्यास उत्सुकता दर्शविली. कल्याण डोंबिवली मध्ये भारतीय जनता पक्षावर प्रेम करणारा मोठा वर्ग राहत असून या निवडणुकीत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर भाजपचा महापौर बसवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे मत जिल्हा अध्यक्ष नंदु परब यांनी व्यक्त केले.
.jpg)


Post a Comment
0 Comments