" चुकीच्या कागदपत्राद्वारे इमारत उभारल्यास त्याची जबाबदारी जमीन मालकाची"
.....महाराष्ट्र राज्य नगररचना संचालक जितेंद्र भोपळे
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
मंजुरीसाठी आलेले कागदपत्र तपासण्यासाठी त्यात कोणत्याही त्रुटी राहू नयेत यासाठी पालिकेच्या नगररचना विभागाचे अधिकारी ऑनलाईन प्रस्तावा बरोबरच ऑफलाईन फाईल्सची मागणी करून तपासणी करत त्रुटी चुका आणि फसवणूक टाळण्यासाठी प्रयत्न करणारच आहेत. मात्र वास्तू विशारदांनी प्रकल्पाच्या मालकाकडून प्राप्त होणारी कागदपत्रे फसवणूक करणारी खोटी नाहीत ना याची देखील तपासून घ्यावी, प्रकल्पासाठी दिलेले कागदपत्र चुकीचे खोडसाळ असतील तर ती जबाबदारी मालकाचीच राहील प्रकल्प उभारण्यासाठी मदत करणाऱ्या आर्किटेक्टची नसेल असे स्पष्ट मत राज्याचे नगररचना संचालक जितेंद्र भोपळे यांनी मांडले.
इंडियन इस्टीटयूट ऑफ आर्किटेक्टस संस्थेच्या कल्याण डोंबिवली विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मंथन या चर्चासत्रात भोपळे बोलत होते. आर्कीटेक्ट केशव चिकोडी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. या चर्चा सत्रासाठी ठाणे महापालिकेचे बीपीएमएसचे डायरेक्टर शैलेन्द्र बेंडाळे, वास्तुविशारद संदीप प्रभू, केशव चिकोडी, राजीव तायशेटे, शिरीष प्रभुणे आणि संदीप पाटील आदींसह राज्यभरातील वास्तुविशारद उपस्थित होते.
नव्या विकास नियमावलीत येणाऱ्या अडचणी नमूद करत या अडचणीमुळे होणारा त्रास आणि त्यात कोणत्या प्रकारे बदल केल्यास ही नियमावली आणखी सूटसुटीत होऊ शकेल याची मुद्देसूद मांडणी करत हे बदल या चर्चासत्राच्या दरम्यान पीपीटीच्या माध्यमातून वास्तू विशारदां नी नगररचना संचालकासमोर मांडत त्यात बदल करण्याची मागणी केली. दरम्यान काही ठिकाणी वास्तू विशारदांना कानपिचक्या देताना काही नियमात बदल करण्याबाबत वरीष्ठाशी चर्चा करत सकारात्मक बदल करण्याचे आश्वासन यावेळी भोपळे यांनी दिले.
दरम्यान यानंतर पत्रकारांशी बोलताना भोपळे यांनी हि परियोजना सर्व वापरकर्त्यांना नजरेसमोर ठेउनच तयार करण्यात आला असून बांधकाम परवानगी मध्ये सुटसुटीतपणा आणण्यासाठी आणि कमीत कमी वेळेत बांधकाम परवानगी मिळावी या उद्देशाने शासनाने विकास नियामक नियत्रण नियमावली २०२० मध्ये आणली असून या नियमावलीनुसार काम करताना विकासक, वास्तू विशारदारांना अनेक ठिकाणी अडचणी उद्भवत आहेत. या अडचणी सोडवून हि प्रणाली अधिक सक्षम आणि वेगवान कशी करता येईल यादृष्टीने आयोजित मंथन कार्यक्रम असल्याचे त्यांनी सांगितले..jpg)


Post a Comment
0 Comments