ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनी आज महापालिकेतर्फे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महापालिका मुख्यालयात महापालिका सचिव किशोर शेळके यांनी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपस्थित माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सुरक्षा अधिकारी भरत बुळे, प्रोग्रामर मीनल भदे,अधीक्षक समाधान मोरे, सहा.माहिती व जनसंपर्क अधिकारी सुमित बोयत तसेच इतर कर्मचारी वर्गाने देखील डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करून अभिवादन केले.
.jpg)


Post a Comment
0 Comments