Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

विठ्ठलवाडी व काळाचौकी येथे 271 निरंकारी भक्तांचे उस्फूर्त रक्तदान

                           ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

"नर सेवानारायण पूजा" या निरंकारी मिशनच्या शिकवणीचा प्रत्यय प्रत्यक्ष कृतीतून घडवत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन द्वारे विठ्ठलवाडी (कल्याण पूर्व) व काळाचौकी येथे आयोजित भव्य रक्तदान शिबिरात 271 निरंकारी भक्तांनी उस्फूर्त रक्तदान केले. सामाजिक व मानवतावादी कार्यांची परंपरा जपत यापूर्वीही सप्टेंबर महिन्यात मिशनद्वारे मुंबई व उपनगरात विविध ठिकाणी भव्य रक्तदान शिबिरांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.


  संत निरंकारी मिशनच्या डोंबिवली झोन 35ए अंतर्गत संत निरंकारी सत्संग भवनविठ्ठलवाडीकल्याण पूर्व येथे रविवारी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात सुमारे 99 निरंकारी भक्तांनी उस्फूर्त रक्तदान केले. यामध्ये 74 पुरुष तर 25 महिलांचा समावेश होता. या शिबिरात रक्त संकलनाचे कार्य संत निरंकारी रक्तपेढीविले पार्ले यांच्यामार्फत करण्यात आले. 

 

शिबिराचा शुभारंभ कल्याण पूर्वच्या आमदार सुलभा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत निरंकार ईश्वराच्या नामस्मरणाने करण्यात आला. यावेळी मंडळाचे उल्हासनगर सेक्टर संयोजक किशन नेनवानी देखील उपस्थित होते. शिबिराला अनेक मान्यवरांनी भेट दिली ज्यामध्ये माजी नगरसेवक मनोज रायविक्रम तरे व सारिका जाधव यांचा समावेश होता. उपस्थित मान्यवरांनी संत निरंकारी मिशन निरंतर करत असलेल्या मानवतावादी कार्यांची मनःपूर्वक प्रशंसा केली. शिबिराचे यशस्वी आयोजन मंडळाचे स्थानिक ब्रांच मुखी अविनाश मानेजी यांच्या देखरेखीखाली स्थानिक सेवादल युनिटच्या स्वयंसेवकांच्या सहकार्याने करण्यात आले.

त्याचप्रमाणे निरंकारी मिशनच्या मुंबई सेक्टर-3 अंतर्गत अहिल्या विद्या मंदिर सभागृहकाळाचौकी येथे रविवारी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये एकूण 172 निरंकारी भक्तांनी उस्फूर्तपणे रक्तदान करून मानवतेच्या सेवेप्रती असणारी उदार भावना कृतीद्वारे प्रकट केली. रक्त संकलन संत निरंकारी रक्तपेढी द्वारे करण्यात आले.  या शिबिराचा शुभारंभ स्थानिक नगरसेवक दत्ता पोंगडे यांच्याद्वारे निरंकार ईश्वराच्या नामस्मरणाने करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक सचिन पडवळ तसेच इतर पक्षांचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.

या शिबिराचे यशस्वी आयोजन मुंबई सेक्टर-3 संयोजक केशव पवार व  स्थानिक ब्रांच मुखी मोहन धुरे यांच्या देखरेखीखाली करण्यात आले. स्थानिक सेवादल युनिटच्या सर्व महिला-पुरुष सेवादल स्वयंसेवकांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.


Post a Comment

0 Comments