Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

मनोदय न्यूरोसायकायट्रीक हॉस्पिटलतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे आयोजन

                    ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

मनोदय न्यूरोसायकायट्रीक हॉस्पिटल तर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्ताने के. सी. गांधी सभागृहात भव्य आणि अर्थपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास सुमारे ३०० नागरिकांनी उपस्थिती लावून मानसिक आरोग्याबद्दलची जागरूकता वाढविण्याच्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. प्रियांका तसेच मानसशास्त्रज्ञ वर्दागौरी आणि श्वेता यांनी सादर केलेल्या भरतनाट्यम नृत्याने झाली. मानसिक आरोग्याचा विषय नवरसांद्वारे अत्यंत प्रभावी पद्धतीने मांडण्यात आला. या नृत्यप्रस्तुतीने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले आणि तब्बल २० मिनिटे सभागृहात पूर्ण शांतता पसरली होती. यानंतर वेध टीम आणि मनोधाय ट्रस्ट यांनी सादर केलेले "तितिक्षा" हे नाटक सादर करण्यात आले. डॉ. अद्वैत पाध्ये यांनी लिहिलेल्या तितिक्षा या पुस्तकावर आधारित हे नाटक मानसिक आरोग्याविषयी महत्त्वपूर्ण संदेश देणारे होते. नाटकातील पात्रांचे विनोदी आणि वास्तववादी अभिनय प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणारा ठरला.

डॉ अमित धर्माधिकारीडॉ अद्वैत पाध्येडॉ प्रियांका धर्माधिकारी यांनी मानसिक आरोग्यावर श्रोत्यांचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या निमित्ताने रील मेकिंग व पोस्टर मेकिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ज्यात गोवामहाराष्ट्र आणि गुजरात येथील स्पर्धकांनी सहभाग घेतला. नृत्यनाटककला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मानसिक आरोग्याविषयी जनजागृतीचे उत्कृष्ट दर्शन घडले. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्र रेडिओलॉजी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शेक्सपियर दत्तामिथुन राजगुरूतन्वी आणि श्रद्धाउमा शहाअमेय म्हात्रे यांचे विशेष योगदान लाभले.


Post a Comment

0 Comments