ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण तालुका पंचायत समीतीच्या दहा गणांचे आरक्षण कल्याण पंचायत समितीच्या सभागृहात उपजिल्हा अधिकारी अश्विनी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी तहसीलदार सचिन शेजाळ, नायब तहसीलदार सत्यजित चव्हाण, कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोय तसेच विविध पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रथम अनुसूचित जाती व जमातीचे आरक्षण काढण्यात आले. त्या मध्ये म्हारळ अ गण अनुसूचित जाती सर्वसाधारण राखीव तर माजंरली गण अनुसूचित जमाती म्हणजे आदिवासी साठी सर्वसाधारण राखीव ठेवण्यात आले आहेत. तर राहिलेल्या आठ गणांपैकी पाच गण महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. त्यामध्ये खडवली गण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, कांबा गण सर्वसाधारण महिला, घोटसई गण सर्वसाधारण महिला, म्हारळ क गण सर्वसाधारण महिला, नडगाव -दानबाव सर्वसाधारण महिला, तर रायते गण सर्वसाधारण, म्हारळ ब गण सर्वसाधारण व राये नागरिकांचा मागास प्रवर्ग इत्यादी दहा गणांचे आरक्षण सोडत काढण्यात आली. 
तसेच कल्याण पंचायत समितीचे सभापती पद आरक्षण हे ठाणे जिल्हा अधिकारी कार्यालयात जिल्हा अधिकारी यांच्या हस्ते काढण्यात आले होते. सभापती पद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी राखीव ठेवण्यात आले आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments