ब्लॅक अँड व्हाईट मुंबई वार्ताहर
रविवार, १२ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबईतील काँग्रेस कमिटी प्रदेश कार्यालय, दादर येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलतर्फे आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मान सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. यावर्षीचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सौ.रामेश्वरी विलास पाटील (ग.वि.स. मंडळ आमची शाळा, टिळक नगर, चेंबूर, मुंबई) देण्यात आला असून, त्यांच्या कार्याचा गौरव करत शैक्षणिक क्षेत्रात नव्या प्रेरणेचा संदेश देण्यात आला आहे.
या सत्कार सोहळ्यास हर्षवर्धनजी सपकाळ (प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती) प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तर विजयजी बडेडीयार (महाविद्यालयीन शिक्षण प्रकल्पप्रमुख), संतोषजी पाटील (राष्ट्रीय शिक्षक परिषद कार्याध्यक्ष), आयोजन समिती व समन्वय समितीचे अध्यक्ष सचिन दुगाड (पुणे), समन्वयक प्रा. यशराज पारखी (पुणे), जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. डॉ. नितिन देढळोळकर (अकोला) आणि सचिव संदीप शेखळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सौ.रामेश्वरी पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात दीर्घकाळ निष्ठेने आणि प्रामाणिकपणे सेवा बजावली आहे. सुशिक्षित, संस्कारी आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवले आहेत. त्यांच्या योगदानामुळे शिक्षणक्षेत्रात आदर्श निर्माण झाला असून. समाजजीवनातही प्रेरणादायी उदाहरण घडले आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराद्वारे ज्ञानदानाचा उत्सव समजणाऱ्या शिक्षक सेवेला सलाम दिलेला आहे.
यावेळी प्रमुख अतिथी हर्षवर्धनजी सपकाळ म्हणाले की, "सौ.रामेश्वरी पाटील यांना मिळालेला पुरक्कार हा केवळ पुरस्कारच नसून तो महाराष्ट्रातील शिक्षकांच्या समर्पणभावनेचं प्रतीक आहे. “ज्ञानदान हेच सर्वश्रेष्ठ दान” या विचाराला मूर्त रूप देणाऱ्या शिक्षकांचा हा सन्मान संपूर्ण शिक्षक समाजासाठी प्रेरणादायी ठरेल."
सदर पुरस्कार मिळाल्याबाबत सौ.रामेश्वरी विलास पाटील यांचे सर्वत्र मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments