येत्या नगरपालिका व महानगर पालिका निवडणुकीत या 3 स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये महायुती होईल का? हा प्रश्न सतत होतो आहे, चर्चा होते आहे.अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत सुद्धा युती ची आशा धूसर होते आहे, अंबरनाथ शहरातील नागरी समस्यांवरून भाजपने पालिका प्रशासनाला कोंडीत धरण्यास सुरूवात केली आहे. अभिजीत करंजुले यांच्या माध्यमातून पालिका क्षेत्रातील पथदिवे, रस्ते आणि इतर समस्यांवरून पालिकेचा टाळे ठोकण्याचा इशाराच दिला आहे. येथेही पालिकेत शिवसेनेचे वर्चस्व असून अप्रत्यक्षपणे शिवसेनेलाच कोंडीत पकडण्याचा हा प्रयत्न सुरू असल्याने भाजप विरूद्ध शिवसेना जुंपली आहे, युती सोबत चर्चा न करताच शिवसेनेने आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार घोषित करुन टाकले आहेत, त्याच प्रमाणे उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत उल्हासनगर शहरातही काही दिवसांपूर्वी भाजपने शहरातील समस्यांवर आक्रमक भूमिका घेतली होती. त्यावरून युतीतील संबध ताणले गेले आहेत. येथील स्थानिक आमदार कुमार आयलानी यांनी थेट पालिका आयुक्तांना आंदोलनाचा इशारा दिला होता. येथेही शिवसेनेची सत्ता होती. तर येथे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा वरचष्मा आहे.
शिवसेना द्वारे युती मध्ये चर्चा न करता येथील स्थानिक साई पार्टी व टीओके ला सोबत घेतल्या मुळे तिकिट वाटपावरुन युती मध्ये तणाव आहे, त्याच प्रमाणे बदलापूर शहरात भाजपचे आमदार किसन कथोरे आणि शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यातील वाद तीव्र होत असल्याची चर्चा आहे. आमदार कथोरे यांनी थेट पालिकेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्याचा इशाराच अधिकाऱ्यांना दिला आहे. चौकाचौकात पालिकेच्या गैरकारभाराचे पुरावे देणार असे सांगत कथोरे यांनी थेट पालिकेवर वर्चस्व असलेल्या शिवसेनेलाच आव्हान दिले आहे. तिथे सुद्धा युती सोबत चर्चा न करताच शिवसेनेने आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार घोषित करुन टाकले आहेत,
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत सुद्धा गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारानंतर भाजप आणि शिवसेनेतील संबध टोकाचे ताणले गेलेले, अशातच भाजप प्रदेशाध्यक्षाकडून महापौर आपलाच म्हणत शिवसेने विरोधात पाऊले उचलून अप्रत्यक्ष प्रतिस्पर्धींना मदत केली जात असून इथेही भाजपकडून स्वबळाचा नारा दिली जात असल्याने इथेही युतीची शक्यता धुसर आहे, आलात तर सोबत नाही तर आडवे करू, शिवसेनेद्वारे ह्या विधानाने सुद्धा युती मध्ये वाद निर्माण असल्याचे दिसत आहेत,
दोन्ही पक्षाकडून एक दुसऱ्याचे उमेदवार खेचण्याचे कार्य सुरु आहेतच,सद्य स्थितिला ह्या "डाकु" DAKU- डोम्बिवली-अंबरनाथ-कल्याण-उल्हासनगर क्षेत्रात तरी सुद्धा युती होणार नाही ऐसे स्पष्ट दिसत आहे. आणि झाली तरी तिकीट वाटपावरुन वाद निर्माण होतील हे स्पष्ट आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments