ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांची शिकवणूक जीवनात उतरवत मानव सेवा हीच ईश्वर सेवा या भावनेचा हृदयस्पर्शी आदर्श प्रस्तुत करत संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून शहापुर आणि घाटकोपर येथे ऐन दिवाळीत रविवारी आयोजित केलेल्या दोन रक्तदान शिबिरांमध्ये 163 निरंकारी भक्तांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
संत निरंकारी सत्संग भवन, शहापुर (जि.ठाणे) या आदविासी भागामध्ये आयोजित रक्तदान शिबिरामध्ये एकंदर 98 निरंकारी भक्तांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान केले ज्यामध्ये 86 पुरुष व 12 महिला रक्तदात्यांचा समावेश होता. या रक्तदान शिबिरामध्ये संत निरंकारी रक्तपेढी व जे.जे.महानगर रक्तपेढी यांचेकडून रक्त संकलन करण्यात आले. मिशनच्या शहापुर, कसारा व वासिंद शाखांमधील निरंकारी भक्तांनी या शिबिरात भाग घेतला.
संत निरंकारी मंडळाच्या कल्याण विभागाचे सेक्टर संयोजक जगन्नाथ म्हात्रे यांच्या उपस्थितित प्रभुनामाचे स्मरण करुन या शिबिराला सुरवात करण्यात आली. या शिबिराला अनेक मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली. त्यामध्ये प्रामुख्याने शिवसेना श्हापुर तालुका अध्यक्ष प्रकाश वेखंडे शिवसेना तालुका संपर्क प्रमुख अरुण कासारे यांच्यासह सामाजिक एवं राजकीय क्षेत्राामध्ये कार्य करणाऱ्या अनेक मान्यवर व्यक्तींचा समावेश होता. सर्व मान्यवर व्यक्तीनी मिशनच्या मानवतावादी कार्याची प्रशंसा केली.
स्थानिक मुखी शैलेश सपकाळे तसेच अन्य शाखांचे मुखी व प्रबंधक यांच्या देखरेखीखाली सेवादल व संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या सदस्यांच्या सहकार्याने हे शिबिर यशस्वीरित्या राबविण्यात आले.
तर शिवाजी हॉल, घाटकोपर येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये मिशनच्या पंतनगर व विद्याविहार या दोन शाखांमधील निरंकारी श्रद्धालु भक्तांनी भाग घेतला आणि एकंदर 65 जणांनी रक्तदान केले.
या शिबिराला अनेक मान्यवर व्यक्तींनी सदिच्छा भेट दिली. त्यामध्ये मुख्यत: माजी नगरसेवक परमेश्वर कदम आणि प्रविण छेड़ा यांचा समावेश होता. या प्रसंगी मान्यवरांनी मिशनच्या निष्काम भावनेने केल्या जाणाऱ्या विविध सामाजिक सेवांचे कौतुक केले. मंडळाचे स्थानिक सेक्टर संयोजक प्रकाश जोशी यांनी शिबिरामध्ये उपस्थित राहून रक्तदात्यांचा उत्साह वाढविला. संत निरंकारी रक्तपेढी, विलेपार्ले मार्फत या शिबिरामध्ये रक्त संकलन करण्यात आले.
पंतनगर ब्रांच मुखी प्रभा सावर्डेकर व विद्याविहार ब्रांच मुखी जयबीर सिंह यांनी सेवादल आणि संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांच्या सहकार्याने हे शिबिर यशस्वीरित्या पार पाडले.
.jpg)



Post a Comment
0 Comments