ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
श्री गणेश मंदिर संस्थान डोंबिवली तर्फे गेली अनेक वर्ष दिवाळी निमित्त आप्पा दातार चौक, डोंबिवली पूर्व येथे युवा भक्ती -शक्ती दिन साजरा केला जातो.त्या अनुषंगाने विविध नृत्य संस्थांनाचे कार्यक्रम राबवले जातात. सोमवारी दिवाळीच्या पहिल्या दिवशी सकाळी अलंकार नृत्यालय, पल्लवी नृत्यनिकेतन संस्था, नृत्य साधना निकेतन प्रस्तुत पारंपरिक नृत्य अविष्काराचा सुमारे 95 कलाकारांसह " नृत्यगंध " ह्या गणेश मंदिर संस्थान आयोजित कार्यक्रमाने रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळवली. तसेच विश्व विक्रमी नोंद संपन्न असणाऱ्या डॉ. अक्षय कुलकर्णी ह्यांच्या शंख वादनाने या कार्यक्रमाला एक अद्वितीय अनभुती प्राप्त झाली.
या कार्यक्रमास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे, रामनगर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जायदवाड, शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेश कदम,श्री गणेश मंदिर संस्थान अध्यक्ष अलका मुतालिक, सचिव प्रवीण दुधे, संजय कानिटकर, खजिनदार गौरी खुंटे, मंदार हळबे, श्रीपाद कुलकर्णी आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमासाठी गणेश मंदिर संस्थान समिती सदस्य सुनिला पोतदार आणि सायली शिंदे यांनी समर्पक निवेदन केले तर दिपाली काळे आणि वृषांक कवठेकर यांचे सहकार्य मिळाले. तर यंदा प्रथमच पोलिस आयुक्तालय ठाणे यांच्या वतीने पोलिस पथकाने देशभक्ती गीतांवर आधारित वादन करून कार्यक्रमाचा समारोप केला.
.jpg)






Post a Comment
0 Comments