ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
काही दिवसांपासून कल्याण पश्चिमच्या सुभाष चौकात व वालधुनी चौकात सकाळपासूनच हमखास वाहतूक पोलिसांकडून वाहतूक जाम केला जात आहे. ज्याच्यामुळे नागरिकांना अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागत आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकांना आपल्या काम धंद्यावर जाण्यासाठी उशीर होत असतो, तर बराच वेळ या वाहतूक कोंडी मध्ये रुग्णवाहिका सुद्धा अडकून पडतात व त्यामुळे रुग्णांचे जीव जाण्याची संपूर्ण शक्यता आहे. वाहतूक पोलीस जाणूनबुजून या चौकात वाहतूक जाम करते अशी भावना सर्वसामान्य नागरिक वाहतूक जाम च्या वेळी व्यक्त करत असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गटाचे माजी प्रदेश सचिव नोवेल साळवे यांनी सांगितले.
पहिले वाहतूक पोलीस रस्त्यावर पुष्कळ खड्डे असल्यामुळे वाहतूक जाम होत आहे असे म्हणायचे परंतु आता शहाडचा पुल बंद असल्याकारणाने वाहतूक कोंडी आहे असे म्हणतात. परंतु शहाड चा पुल वाहतूकीसाठी बंद केल्यानंतर उल्हासनगर शहरात सुद्धा तेवढीच वाहतूक कोंडी झाली पाहिजे होती परंतु तसे होत नाही. मुळात हे वाहतूक कोंडी फक्त कल्याण व परिसरातील नागरिकांना त्रास देण्याच्या उद्देशाने व वाहतूक पोलीस आपली उपस्थिती दाखवण्यासाठी हे जाणूनबुजून करत असल्याचा आरोप साळवे यांनी केला आहे. सध्या वाहतूक पोलिसांचे दोनच अजेंडा दिसत आहे, एकतर नागरिकांकडून कुठल्याही मार्गाने त्रास देऊन पैसे उकळने व वाहतूक जाम करून नागरिकांचे लक्ष विचलित करणे आहे.
मुळात जनतेला मोठा प्रश्न पडला आहे की ज्या ठिकाणी रस्त्यावर वाहतूक पोलीस उभे असतात त्याच ठिकाणी वाहतूक कोंडी कशी होते आणि वाहतूक पोलीस ज्या ठिकाणी उभे नसतात त्या ठिकाणी वाहतूक रस्त्यावर दिसत सुद्धा नाही. जनतेला लुटण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पुन्हा टोईंग वॅन सुरू केली आहे. वाहतूक पोलिसांकडून अनेक प्रकारे सर्वसामान्य नागरिकांकडून पैसे उकळण्याच्या दररोज योजना सुरू असल्याचा दावा साळवे यांनी केला आहे.
.jpg)


Post a Comment
0 Comments