ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली (विद्या कुलकर्णी )
मराठीतील जागतिक वैज्ञानिक कोशकार शशिकांत कर्डेकर यांच्या ई पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.राष्ट्रीय शिक्षण संस्खेचे माजी अध्यक्ष व गणेश विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य शशिकांत कर्डेकर यांच्या ‘या दिवशी विज्ञानात’ या ई बुक मालिकेतील ऑक्टोबर महिना भागाचे प्रकाशन टिटवाळा येथे गणेश विद्यालयाच्या सभागृहात सिध्दिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष माननीय सुभाषराव जोशी यांच्या हस्ते झाले.यावेळी सुप्रसिद्ध लेखक,सिनेपत्रकार मा.श्री.दिलीप ठाकूर यांनी प्रसिध्द शोले चित्रपटाला ५० वर्ष झाल्याने ‘शोले’ नामक लिहिलेल्या पुस्तकाचेही प्रकाशन झाले.
यावेळी ई साहित्य प्रतिष्ठानचे श्री.सुनील सामंत व मराठीतील पहिले ई पुस्तक तयार करणारे प्रसिध्द संगिततज्ञ व लेखक श्री.डॉ.अनंत पावसकर व संस्थेचे पदाधिकारी श्री.विवेक पुराणिक,श्री.चंद्रशेखर दलाल उपस्थित होते.
या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन डिजिटल माध्यमातून करण्यात आले.यावेळी डॉ..पावसकर यांनी ई बुकची कल्पना आपल्याला कशी सुचली हे सांगून काळा प्रमाणे वाचनाचे माध्यमही बदलत असून आता छान पुस्तकां ऐवजी वाचक मोबाईल व लॅपटॉपला पसंती देत आहेत.प्रकाशन व्यवसाय प्रचंड महाग झाल्याने प्रकाशक नवोदितांच्या लेखनाला हात लावण्यास तयार नसतात अशा लेखकांच्या लेखनाला ई बूक प्रकाशाची वाट दाखवण्याचे काम ई साहित्य प्रतिष्ठान करत आहे ही बाब कौतुकास्पद आहे.
यावेळी ‘शोले’ पुस्तकाचे लेखक श्री.ठाकूर म्हणाले प्रत्येक चित्रपट आपले भाग्य घेऊन निर्माण होत असतो..त्यांनी थोडक्यात शोले चित्रपटाचे रसग्रहण करून त्याच्या लोकप्रियतेची कारणे उलगडून सांगितली.

यावेळी बोलताना श्री कर्डेकर म्हणाले, ‘एकविसाव्या शतकाच्या तिस-या दशकच्या मध्यावर आपण येऊन पोहचलो असून विज्ञानाच्या जीवतंत्रज्ञानाच्या प्रगतीने सामाजिक व सांस्कृतीक जीवनप्रणालीत अमूलाग्र बदल झाला असून या बदलाच्या वेगाचा वेध प्रचलीत शिक्षणाने घेण्याची अवशकता असल्याने मी या पुस्तकांच्या मालिकेची निर्मीती केली.या पुस्तकांचा शाळाशाळांतून दिनविशेष लिहीण्यासाठी वापर करून विद्यार्थ्यांच्या मध्ये विज्ञान विषयक जागृती निर्माण करण्यास उपयोग होईल असा मला विश्वास वाटतो..’
.jpg)

Post a Comment
0 Comments