ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
उल्हासनगरचे माजी उपमहापौर, विरोधी पक्षनेते आणि (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोराडे उर्फ आबा यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात व सामाजिक कार्यातून साजरा करण्यात आला.
श्री.धनंजय बोराडे यांनी सर्वप्रथम देवदर्शन घेत प्रेमकुंज वृद्धाश्रमात जाऊन ज्येष्ठ नागरिकांबरोबर आपला वाढदिवस साजरा केला तसेच त्यांच्यासाठी किराणा सामान सप्रेम भेट देऊन, त्यांच्याबरोबर जेवण करून आत्मिक आनंद लुटला
तसेच उल्हासनगर येथील यशवंत विद्यालय येथे देखील विद्यार्थ्यानी व शिक्षकांनी त्यांचा वाढदिवस हार्दिक शुभेच्छा देत साजरा केला. तसेच उल्हासनगर येथील लखजीवन गौशाला जाऊन गोमातेला घास भरवून गोमातेचा आशीर्वाद घेतला. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक दायित्वाच्या भावनेतून केलेल्या कार्यातून आत्मिक शांती मिळते.प्रेम आणि माणुसकी शिवाय जगात शाश्वत काही नाही.सामाजिक कार्यातून जे समाधाम मिळते ते अतिशय महत्त्वाचे आहे. अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
.jpg)








Post a Comment
0 Comments