ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
विद्यासेवक पतपेढी ही ठाणे व पालघर जिल्ह्यातील ७ हजार शिक्षक शिक्षकेतर सभासदांची नामवंत पतसंस्था आहे. संस्थापक वसंत बापट, जयंत ओक व रामनाथ मोते यांनी सुरू केलेल्या उपक्रमात गेली ३८ वर्षापासून आपल्या गुणवंत सभासद व पाल्यांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात येतो. या वर्षी गुणवंतांची उपस्थिती अधिक असल्याने त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पुढील वर्षापासून गुणगौरव कार्यक्रम पतपेढीच्या ८ शाखांत विभागून करण्यात येईल असे पतपेढीचे अध्यक्ष सुधीर देवराम घागस यांनी बोलताना सांगितले.
दि.28 सप्टेंबर 2025 रोजी आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण येथील कार्यक्रमात पतपेढीच्या सुमारे ३०० सेवानिवृत्त सभासदांचा कृतज्ञता समारंभ आयोजित करण्यात आला होता. तर गुणगौरव कार्यक्रमासाठी पदवीधर आमदार ॲड.निरंजन डावखरे, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे उपस्थित होते. पाहुण्यांच्या व संचालकांच्या हस्ते शिक्षणोपयोगी व गृहोपयोगी भेटवस्तू देऊन सुमारे ९५० सभासद व पाल्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संचालक मंडळ व पतपेढी कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यवाह सायली बुटेरे तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष दिगंबर बेंडाळे यांनी केले. निमंत्रित पाहुण्यांनी पतपेढीच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
.jpg)




Post a Comment
0 Comments