Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याणमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी विजयादशमी पथसंचलन उत्साहात


शिस्तसंघटन आणि राष्ट्रभक्तीचा 

भव्य आविष्कार

                  ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण झाले आहेत. त्याचे औचित्य साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कल्याण जिल्ह्यातील विवेकानंद नगरातर्फे आज रविवारी सकाळी आयोजित शताब्दी विजयादशमी पथसंचलन दिमाखात आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. यावेळी संघाच्या शेकडो स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पावलांतून पथ संचलनाद्वारे विविध भागांमध्ये राष्ट्रभक्तीची लहर पसरवल्याचे दिसून आले.

कल्याण पश्चिमेतील सुभाष नगर - वाडेघर मार्गावर असलेल्या विवेकानंद नगरातील शशांक शाळेपासून या पथ संचलनाला सुरुवात झाली. तिथून पुढे लालचौकी येथील शिंदे मळाएम के हायस्कूल मार्गसंत गजानन महाराज नगरबेतुरकर पाडासहजानंद चौकजैन सोसायटीमार्गे संतोषी माता रोड परिसरातील नवजीवन शाळेच्या मैदानात या संचलनाचा समारोप करण्यात आला. नेहमीप्रमाणेच अतिशय नियोजित आणि शिस्तबद्ध पद्धतीने हे पथ संचलन करण्यात आले. शताब्दी वर्षानिमित्त आयोजित या पथसंचलनाच्या माध्यमातून संघाच्या मूलभूत मूल्यांचा पुनरुच्चार करण्यात आला. तर हे पथसंचलन जाणाऱ्या मार्गावरील शिंदे मळा बैठकगजानन महाराज मंदिरइस्कॉन कल्याणसुंदर नगरसह विविध संस्था आणि सोसायटींकडून स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी करून जोरदार स्वागत करण्यात आले.

संघाचा भाग होणे हे केवळ सन्मानाचे नव्हे तर राष्ट्रचेतना जागवणारे अनुभव आहे. “आपल्या जडणघडणीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोठा वाटा आहे. संघटनराष्ट्रभक्ती आणि शिस्त ही संघाची खरी ताकद आहे,” अशी प्रतिक्रिया यावेळी सहभागी झालेल्या संघस्वयंसेवकांकडून व्यक्त करण्यात आली. 


Post a Comment

0 Comments