Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

शिवमुद्रा नृत्यालयाचा गरबा उत्सव संपन्न

             ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली ( विद्या कुलकर्णी )

शिवमुद्रा नृत्यालयाच्या वतीने दिनांक ४ ऑक्टोबर २०२४ रोजी गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन शिवमुद्रा नृत्यालयाच्या संचालिका श्रीमती राधिका कुलकर्णी पंड्या, निशांत पंड्या आणि व्यवस्थापनामध्ये प्रसाद म्हेत्रे यांनी केले होते.

या गरबा महोत्सवात विविध स्पर्धा घेण्यात आल्या, ज्यात बेस्ट गरबा, बेस्ट ड्रेसिंग आणि स्टुडंट ऑफ द इयर या बक्षिसांसाठी स्पर्धकांनी जोरदार सहभाग घेतला होता. या स्पर्धांचे परीक्षक विद्या कुलकर्णी मॅडम आणि रश्मी मिश्रा यांनी आपला बहुमूल्य वेळ आणि मार्गदर्शन देऊन सर्व सहभागींचा उत्साह वाढवला.

या कार्यक्रमात आई आणि मुलगी यांनी एकत्रितपणे सहभाग घेतला. त्यानंतर गरबा आणि राम वॉक स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धांमध्ये तस्मयी कीर, कनिषा वासन, दुर्वा कीर, पल्लवी दुसाने, आज्ञा टोडणकर, रजनी शहा, अनया शहा, अधित्री दास, रुही दुरापे, दक्षी बीजे, आराध्या कुलकर्णी, सुष्मिता एस, आणि विनोलिया विनोद या विजेत्या ठरल्या.स्टुडंट ऑफ द इयर या पुरस्कारासाठी आद्या बेसरीया, नमस्वी चौधरी, ओवी घाटवाल आणि अभिधन्या लांडगे या विजेत्या ठरल्या.शिवमुद्रा नृत्यालयाने आयोजित केलेला हा गरबा उत्सव सर्व सहभागी आणि उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला.

Post a Comment

0 Comments