ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
स्व.पूजनीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या संकल्पनेतून आणि शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे माजी मुख्यमंत्री,आणि विद्यमान उपमाख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेने डोंबिवलीतील शिवसेनेच्या विविध प्रभागांत किल्ले बांधणी आणि भव्य रांगोळी स्पर्धा मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आली होती. सांगाव, नांदिवलीपाडा,देसलेपाडा, आणि भोपर लोढा येथील शाखांच्या वतीने संपूर्ण डोंबिवलीत ही स्पर्धा आयोजित केली होती.
सदर स्पर्धेत शेकडो महिलांनी आणि मुलांनी हिरीरीने सहभाग घेतला होता.त्यातून उत्कृष्ट रांगोळी आणि उत्कृष्ट किल्ले बांधणी यांना निवडण्यात आले.सदर स्पर्धेत विविध प्रभागातील प्रथम,द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ अशी असंख्य पारितोषिके वितरण करण्यात आले.त्या प्रसंगी श्री.गोपाळ लांडगे,अध्यक्ष शिवसेना कल्याण जिल्हा अध्यक्ष,श्री.राजेश मोरे विद्यमान आमदार डोंबिवली ग्रामीण,श्री जितेन पाटील युवा सेना ठाणे जिल्हा संघटक, श्री राजेश कदम उपजिल्हाप्रमुख शिवसेना,सौ.लताताई पाटील,जिल्हा महिला संघटक,कविताताई पाटील,शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख,श्री भरत भोईर,उपजिल्हाप्रमुख शिवसेना,सौ.कल्पनाताई पाटील,शिवसेना तालुका संघटक, श्री.महेश पाटील,कल्याण तालुका प्रमुख,शिवसेना,श्री.अर्जुन पाटील तालुका संघटक कल्याण ग्रामीण,श्री बंडू पाटील कल्याण ग्रामीण संघटक,सौ.इंदिरा ताई भोईर उपजिल्हा संघटक,सौ. तृप्ती ताई पाटील राज्यकार्यकरिणी सदस्या,शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्ष.आणि अनेक आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवेदिका सौ.करुणा सचिन गगे यांच्या उत्कृष्ट निवेदनाने संपूर्ण सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.
.jpg)












Post a Comment
0 Comments