ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण पश्चिम आधारवाडी परिसरातील लक्ष्मीबाई सीताराम कारभारी उद्यानात विद्युत दिव्यांची सोय करण्यात आली.2017 पासून हे उद्यान उभारले गेले होते, परंतू काही तांत्रिक कारणामुळे उद्यानातील सोयीं बाबतीत अडचणी निर्माण झाल्या होत्या, परंतू आमदार श्री विश्वनाथ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी नगरसेवक जयवंत भोईर,माजी नगरसेवक प्रभुनाथ भोईर,रामदास कारभारी यांच्या पाठपुराव्यामुळे आज महापालिकेकडून उद्यानातील विजेच्या दिव्यांची सोय करण्यात आली.
त्याचे लोकार्पण माजी नगरसेवक जयवंत भोईर आणि प्रभुनाथ भोईर यांच्या हस्ते करण्यात आले.त्या प्रसंगी वैभव भोईर,भरत भोईर आणि अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर उद्यानात येणाऱ्या नागरिकांना ह्या विद्युत् दिव्यांच्या लागण्यामुळे अतिशय सुरक्षित वातावरण तयार झाले आहे.अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
.jpg)






Post a Comment
0 Comments