Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

मनसेच्या कस्तुरी देसाई आणि कौस्तुभ देसाई यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

                     ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

हे जनसंपर्क कार्यालय हे केवळ राजकारणाचे नाहीतर जनसेवेचे केंद्र असेल. आम्ही या कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्यातक्रारी व स्थानिक विकासकामांबाबत सदैव तत्पर राहू असे आश्वासन मनसे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी दिले. मनसे महिला सेना शहर अध्यक्षा तथा माजी नगरसेविका कस्तुरी देसाई आणि मनसेचे माजी शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाई यांच्या रामबाग रोड नंबर 4 चिकनघर येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व माजी आमदार राजू पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. या प्रसंगी राजू पाटील यांनी मनसेच्या व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व स्थानिक नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी आमदार तथा मनसेचे सरचिटणीस प्रकाश भोईर, जिल्हा अध्यक्ष उल्हास भोईरमाजी  नगरसेवक पवन भोसले, महिला सेनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष उर्मिला तांबेजिल्हा सचिव वासंती जाधव, उपजिल्हा अध्यक्षा सुनीता शेलार, शहर सचिव माजी नगरसेविका लक्ष्मी बोरकर, शहर सचिव अर्चना चिंदरकर आदी सर्व मनसैनिक,पदाधिकारी कार्यकर्तेमहिलासेना उपस्थित होते. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण शहराध्यक्ष बाळा परब, विभाग अध्यक्ष रोहित भोईर, महिला सेनेच्या लोकसभा संपर्क अध्यक्ष राजलक्ष्मी अंगारकेगोकुळ पाटीलश्याम मेमाणे आदी शिवसैनिक, युवा सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

यावेळी राजू पाटील यांनी भाजपसह एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. आमचे मागचे शिलेदार यांच्या कार्यालयाचे उद्घाटन आम्ही सुरू करणार आहोत त्याची सुरुवात या ठिकाणहून झालेली आहे. सगळीकडेच मतदार यादी मध्ये घोळ आहे. मी स्वतः कल्याण ग्रामीण मधील दोन पॅनलची चाचणी केली. दिवा मधील दोन पॅनल मध्ये 16 हजार 798 दुबार मत मिळाली आहे. त्यामध्ये एका माणसाची पाच मत आहेतही लोकं खोटेपणा करून सत्तेत आलेले आहेत यापुढे त्यांचे खोटारडेपणा चालू नाहीयासाठी एक तारखेला आम्ही मोर्चा देखील काढणार असल्याचे राजू पाटील यांनी सांगितले. प्रत्येक मतदार यादी तपासून बघा बोगस मतदार असतील. तर तुम्ही निवडणूक बॅलेट पेपर वरती घ्या किंवा ईव्हीएम वरती घ्या कोणी निवडून येणार नाही त्यामुळे याद्या फिल्टर करायचं काम करण्याचे आवाहन पाटील यांनी केले. 

Post a Comment

0 Comments