ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याणमध्ये रोबोटच्या सहाय्याने गुडघ्यावरील शस्त्रक्रिया होणार असून कल्याण पश्चिमेतील बैल बाझार चौकात कल्पतरू रुग्णालयात रोबोटिक शस्त्रक्रिया केंद्राचे उद्घाटन रविवारी करण्यात आले. शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्याहस्ते फित कापून या केंद्राचे उद्घाटन झाले. यावेळी महाराष्ट्र रेडीओलॉजी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याणच्या अध्यक्षा डॉ. सुरेखा ईटकर, शिवसेना महिला उपजिल्हा प्रमुख नितु कोटक, कल्पतरू रूग्णालयाचे डॉ. जीवक घाडगे, डॉ. अश्विन पाटील, डॉ. तनुजा घाडगे, रवींद्र घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
कल्पतरू रुग्णालयाची स्थापना ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. जीवक घाडगे यांनी २०१४ मध्ये केली आहे. कल्पतरू हॉस्पिटल येथे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी या सारख्या शासकिय आरोग्य योजना सुरू करणार आहे. तसेच कल्पतरू हॉस्पिटल मध्ये टोटल नी रीप्लेसमेंट व टोटल हिप रीप्लेसमेंट या सारख्या शस्त्रक्रिया या अत्याधुनिक रोबोटिक टेक्नॉलॉजीचा वापर करून केल्या जाणार आहेत. रुग्णांची शस्त्रक्रिये नंतर व विविध आजारांपासून रिकवरी लवकर व्हावी, उत्तम आरोग्य प्राप्ती व्हावी याकरिता कॅंगेन वाटर (अल्कलाइन वॉटर) मशीन बसविण्यात आली आहे. यासर्व नाविन्यपूर्ण उपक्रमांचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितित झाले असल्याची माहिती रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली.
.jpg)




Post a Comment
0 Comments