Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

टिटवाळा ट्रेन मध्ये चाकरमान्यांकडून दसरा पुजा संपन्न

                     ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

रोज सकाळीची 5:34 टिटवाळा तें मुबंई छत्रपती शिवाजीमहाराज ट्रमिनल या लोकल डब्यात सालाबादप्रमाणे आज दिनांक 1 ऑक्टोबर,2025 रोजी, विजयादशमीचा उत्सव सर्वांनी मिळून मोठया उत्साहात  साजरा करण्यात आला.ऊन-वारा-पाऊस,थंडी असो की गर्मी, "गर्दी" हा तर लोकल प्रवासाचा अविभाज्य मित्रच.

 सांगा कस जगायचं? - मंगेश पाडगांवकर यांची...सुप्रसिद्ध कविते प्रमाणे.. सांगा कस जगायचं? कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत

तुम्हीचं ठरवा! मग खुप गर्दी आहे म्हणून रडत बसायचं,

की, गर्दीत हसण्याचे क्षण शोधायचे...

*सांगा कस जगायचं?* कण्ह्त कण्ह्त की गाणं म्हणत

 तुम्हीचं ठरवा!  ठरवा काय...? मुंबईकरांनी ठरवूनच टाकलं आहे.

गाणे.. भजन म्हणत हसत हसतच जगायचं.

"दसरा' पुजा म्हणजे प्रत्येक लोकल ट्रेन प्रवाश्यांचा वार्षिक पवित्र पुजन दिवसच.

आपल्याला रोज सुखरूप दैनंदिन कामकाजासाठी घेऊन जाणारी लोकल ट्रेन म्हणजे मुंबई करांची पुष्पक विमानच जणू, आणि ते चालविणारे गार्ड म्हणजे देवदूत.

या दसऱ्याच्या दिवशी या गार्डरूपी देव दूतांना शाल, श्रीफळ , प्रसाद देऊन कृतज्ञता व्यक्त केली जाते.आणि आपल्या नेहमीच्या डब्याला सजवून, देवीच्या प्रतिमेची आरती पुजा करून मनोभावे सर्व सहप्रवासी  दसऱ्याच्या शुभमुहूर्त निमित्ताने एकमेकांना शुभेच्छा देतात.

बी.एम.सी.मध्ये कार्यरत श्री आनंदा खाडे, श्री रामदास लांडगे तसेच प्रॉपर्टी कन्सल्टंट आणि चित्रकार आनंदकिशोर मेहर सर यांच्या पुढाकाराने रोज सकाळीची 5.34च्या टिटवाळा ट्रेन मध्ये दसरा पुजा संपन्न झाली.यावेळी सकाळ, दुपारच्या वेळी कामावर जाणारी असे खालील प्रमाणे सर्व 20 सहप्रवासी उपस्थित होते.

रामदास लांडगे, आनंदकिशोर मेहर सर 9320265626,         अनंदा खाडे8976606585,नारायण भंडारी,नरेश चोरवे ,रामनाथ बेंडकोळी ,कपिल पोंक्षे ,तानाजी पदमेरे,विकी भाऊ,प्रकाश शिंगोळे सुभाष पाटील, अर्जुन साबळे ,कीरण डामसे,नवनाथ खेताडे,सतिश पवार ,केशव गवारी,संजय सिंग, शिंदे महेश,अमोल देशमुख, गणेश मगर सर्वांचे मनःपूर्वक आभार व शुभमुहूर्त विजयादशमीच्या  निमित्ताने हार्दिक शुभेच्छा

 हा उत्सव आनंदाने साजरा होण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली त्या सर्वांचे प्रवाशांनी मनःपूर्वक आभार मानले.  सर्व मिळून असेच एकमताने पुढील आपला दैनंदिन प्रवास, उत्सवरूपी आनंदाने साजरे करूयात अश्या शुभेच्छा देत सर्व उत्साहात आपापल्या दैनंदिन कामासाठी निघाले.

Post a Comment

0 Comments