Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

ठाणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनीच उपायुक्तांना २५ लाखांची लाच घेताना अटक

उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यावरील कारवाईने महापालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे.               ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे (अतिक्रमण विभाग) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) २५ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात ताब्यात घेतले आहे. उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यावरील कारवाईच्या वृत्ताने महापालिका प्रशासनात खळबळ 

                    ब्लॅक अँड व्हाईट ठाणे वार्ताहर

ठाणे महापालिकेच्या पाचपाखाडी येथील मुख्यालयात ही कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर पथकाकडून पुढील कारवाई सुरु झाली आहे. ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांनी यापूर्वी अभिराज डेव्हलपर्सचे मालक अभिजित कदम यांच्याकडून १० लाख रुपये स्वीकारले होते. बुधवारी त्यांना १५ लाख रुपये स्वीकारताना भ्रष्टाचार विरोधी पथकाने रंगेहात पकडले आहे.

बुधवारी सायंकाळी ६:५० वाजता भ्रष्टाचार विरोधी पथकाचे अधिकाऱ्यांनी त्यांच्या केबिनमध्ये जाऊन तपास करीत आहेत. या प्रकरणात अधिक चौकशी सुरू असल्याचे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी  सांगितले

महापालिकेत ACBच्या कारवाईत एक बडा अधिकारी जाळ्यात!
ठाणे महापालिकेच्या पाचपाखाडी येथील मुख्यालयात ही कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर पथकाकडून पुढील कारवाई सुरु झाली आहे
 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या ठाणे शहरातील ठाणे महापालिकेत लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या मुंबई विभागाने छापा टाकल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली. ठाणे महापालिकेचा आज, बुधवारी ४३ वा वर्धापन दिन आहे. महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी (एसीबी) सायंकाळपासूनच ठाण मांडून असल्याचे समजते. एका बांधकाम व्यवसायिकाच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी त्यांनी २५ लाख रुपयांची लाच मागितल्याचे कळते आहे.

गेल्याकाही दिवसांपासून ठाणे शहरात सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या बांधकाम प्रकरणी न्यायालयीन चौकशी सुरु आहेत. त्यात अतिक्रमण नियंत्रण विभाग रडारवर असतानाच ही कारवाई झाली आहे. ठाणे महापालिकेत शंकर पाटोळे हे अतिक्रमण नियंत्रण विभागात उपायुक्त पदावर कार्यरत आहेत.

बुधवारी ठाणे महापालिकेचा ४३ वा वर्धापनदिन साजरा केला जात होता. त्यामुळे महापालिकेच्या पाचपाखाडी येथील मुख्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शंकर पाटोळे हे बुधवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास कार्यालयात असताना मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने त्यांना लाचेचा हप्ता घेताना हातोहात पकडल्याचे समजते.
तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक असून पाटोळे यांनी त्यांच्याकडून लाचेची मागणी केल्याचे कळते आहे. ठाणे महापालिकेच्या पाचपाखाडी येथील मुख्यालयात ही कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर पथकाकडून पुढील कारवाई सुरु झाली आहे.
मुंबईतील एका बांधकाम व्यवसायिकाची ठाण्यातील घंटाळी परिसरात जागा आहे. त्या जागेवर अतिक्रमण होते. अतिक्रमण हटविण्यासाठी ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांनी २५ लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर बांधकाम व्यवसायिकाने मुंबई एसीबीकडे तक्रार केली. त्याआधारे, या पथकाने सापळा रचून आज कारवाई केली. 


Post a Comment

0 Comments