Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

सामाजिक कार्यकर्ते व शिक्षणतज्ज्ञ सुनील म्हसकर यांचा विशेष सन्मान...


                    ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

रविवार दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी शहापूर येथे शहापूर तालुका आगरी समाज संचलित सामाजिक व शैक्षणिक संस्था, वाफे-शहापूर यांच्या वतीने आयोजित गुणगौरव सोहळ्यात सामाजिक कार्यकर्ते व शिक्षणतज्ज्ञ आणि प्रज्ञावंत साहित्यिक सुनील म्हसकर यांचा भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक, पुष्पगुच्छ व महावस्त्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री जगन्नाथ पाटील, ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प.गोविंद महाराज तरणे, समाज कल्याण न्यास अध्यक्ष सोन्या पाटील, टीडीसी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण गोंधळी, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी किशोर शेळके, उद्योजक अनिल मानिवडे, समाजसेवक नारायण अंदाडे, कमलाकर जाधव व जयराम वारघडे आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी या कार्यक्रमात पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे पंडीत मसणे (दहागाव) यांचा विशेष गौरव करण्यात आला. तसेच तालुक्यातील डॉ.विशाखा मिलिंद अधिकारी (शहापूर), डॉ.नम्रता बाळाराम तरणे (पाली), डॉ.नीलम प्रकाश परटोले, धाडसी रेल्वे पोलीस कर्मचारी किशोर परटोले (अंबर्जे), जान्हवी जयवंत परटोले,  अभियंता प्रणय अधिकारी (सरळांबे) अशा विविध गुणवंतांचा आणि दहावी, बारावी, पदविका आणि इंजिनिअर, डॉक्टर, वकील आदी पदवी परीक्षांमध्ये विशेष नैपुण्यधारक विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी समाजात उत्तम कार्य करून आपला आदर्श समाजापुढे ठेवणाऱ्या हरिभाऊ गोतारणे (शहापूर), कृष्णा परटोले (अंबर्जे), हभप कोंडू महाराज (भातसई), रघुनाथ राव (वाफे) इत्यादी जेष्ठ नागरिकांचा उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार  करण्यात आला. 

   सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब खारीक, सचिव काशिनाथ डोंगरे, खजिनदार प्रकाश गोंधळी, उपाध्यक्ष शाहु जाधव तसेच विश्वस्त मंडळ उपाध्यक्ष जयराम पवार, सचिव नारायण राव, सुनील गोपाळे, समिर म्हात्रे, राम खारीक आदी संस्था पदाधिकारी व सदस्य तसेच सूत्रसंचालक अरुण कराळे यांनी परिश्रम घेतले. 

आशिया खंडात स्टील उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या जिंदाल कंपनीच्या उद्योग विस्तारासाठी एमआयडीसी अर्थात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने शहापूर तालुक्यातील मौजे पाली हे गाव भूसंपादन करावयास घेतले आहे. हा प्रकल्प शासकीय दराप्रमाणे तीन हजार कोटी रुपयांचा आहे. मात्र, मागील २८ वर्षे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्वामी विवेकानंद संस्था, पाली या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील म्हसकर यांनी संविधानिक मार्गाने संस्थेच्या पदाधिकारी व ग्रामस्थांच्या मदतीने वेळीच आपल्या जीवाची पर्वा न करता तन-मन-धन अर्पण करून गेली चार वर्षे सदर अन्यायकारी भूसंपादन प्रक्रिया रोखली आहे.  

सुनील म्हसकर सर हे एक शिक्षणतज्ञ असून त्यांची महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार तयार करण्यात येत असलेल्या नवीन अभ्यासक्रम विकसन समितीवर मराठी विषय तज्ञ मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात आली आहे. ते सुप्रसिद्ध व्याख्याते व प्रज्ञावंत साहित्यिक असून त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक रिसर्च पेपर, शोधनिबंध व लेख तसेच कविता विविध नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाल्या आहेत.

शिक्षणतज्ज्ञ सुनील म्हसकर यांचा विशेष सन्मान झाल्याबाबत त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments