ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रकाश पगारे यांचा द्वेषभावनेतून भर चौकात अपमान करणाऱ्या भाजपा नेत्यांविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भीमशक्ती संघटना आक्रमक झाली असून विद्यमान खासदार आणि भीमशक्तीचे संस्थापक चंद्रकांत हंडोरे यांच्या आदेशाने भीमशक्ती संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ऍड. अपेक्षा दळवी यांच्या नेत्तृत्वाखाली शिष्टमंडळाने प्रांताधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. नायब तहसीलदार कविता देशमुख यांनी हे निवेदन स्वीकारले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ऍड. अपेक्षा दळवी, भीमशक्तीचे मंगेश इंगळे, अण्णा पंडित, दीपक मागाडे, ऍड. गुलाब खंदारे, सचिन भोसले, उज्ज्वला पंडित, अशोक पगारे, आदर्श दळवी, सचिन संगारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रकाश पगारे हे बौध्द्र समाजाचे असून जातीयवादी भाजपा पदाधिकारी यांना ज्ञात आहे. तरी त्यांनी जातीय द्वेष भावनेतून प्रकाश पगारे या जेष्ठ काँग्रेस नेते व मागासवर्गीय सामाजिक कार्यकर्त्यांचा चारचौघात जातीय द्वेष भावनेतून पाणउतारा केला व त्यांची प्रतिष्ठा डावललेली. त्यामुळे भाजपा जिल्हा अध्यक्ष नंदू परब, माळी व इतर यांच्यावर त्वरीत अनु. जाती जमाती अत्याचार प्रतिबंध सुधारित २०१५ नुसार त्वरीत गुन्हा दाखल करावा. अन्यथा खासदार व भिमशक्ती संघटनेचे संस्थापक चंद्रकांत हांडोरे यांच्या आदेशाने भिमशक्ती संघटना महाराष्ट्र प्रदेश संविधानिक पध्दतीने रस्त्यावर उतरेल असा इशारा ऍड. अपेक्षा दळवी यांनी दिला आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments