Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

शहापूर तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रम संपन्न

                        ब्लॅक अँड व्हाईट शहापूर प्रतिनिधी 

 पंचायत समिती, शिक्षण विभाग शहापूर तर्फे दि.१/१०/२०२५ रोजी शहापूर विधानसभेचे आमदार तथा अनुसूचित जाती जमाती अध्यक्ष महाराष्ट्र राज्य (राज्यमंत्री दर्जा) मा. श्री. दौलतजी दरोडा साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम शेटे हॉल शहापूर येथे संपन्न झाला.

      शहापूर तालुक्यात शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख उंचावणाऱ्या गुणवंत शिक्षकांना मा. आमदार श्री. दौलतजी दरोडा यांच्या हस्ते शाल-श्रीफळ, ट्रॉफी, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आला. शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय प्रवेश परीक्षा, मंथन परीक्षा, भारत टॅलेंट सर्च यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये शहापूर तालुक्याचे नाव महाराष्ट्र राज्याच्या पटलावर कोरण्याचे काम सर्व शिक्षक करत आहेत. विविध समाज संस्थामार्फत शाळांना भौतिक सुविधा, इमारत निधी, प्रभावी तंत्रज्ञान साधने शिक्षकांनी मिळवून दिली आहेत. सदर कार्यक्रमाप्रसंगी सौ. दर्शना बाळू वेखंडे,सौ. भाग्यश्री भरत मडके,सौ. सोनल  शाम पाटील,श्री.श्याम शिवराम घोडविंदे श्री. मदन पांडुरंग साबळे,श्री. संजय काशिनाथ शिंदे,सौ. वैशाली प्रसाद शिंदे, श्री. मनोज जगन्नाथ बागुल,श्री. सतीष नारायण भोईर,श्री. रतन हरिभाऊ रामटेके,श्री. निलेश अशोक देवकर,श्री. वाळू सोमाजी तळपाडे,श्री शिवाजी महादेव पाटील,श्री जयवंत दामू मोगरे, श्रीमती श्रद्धा कृष्णा पाटील,

श्री.पद्माकर मधुकर जाधव या शिक्षकांना शहापूर तालुका आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. सदर कार्यक्रम प्रसंगी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, विविध संघटनांचे पदाधिकारी, तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. बी. एच. राठोड, गटशिक्षणाधिकारी श्री. रामचंद्र विशे, विस्ताराधिकारी श्री. हिराजी वेखंडे, श्रीम.शिवानी पवार मॅडम, श्रीम.संगीता माळी मॅडम श्री.शिंदे, तसेच सर्व विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.ढमके सर व श्री.मनोहर मडके सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री. हिराजी वेखंडे यांनी केले.

Post a Comment

0 Comments