ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण पूर्वेतील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था लक्षात घेऊन कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे कल्याण पूर्वच्या आमदार सुलभा गायकवाड यांनी वारंवार पत्रव्यवहार करून, सतत पाठपुरावा करत मागणी केली होती. प्रशासनाने केलेल्या दिरंगाईमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. आमदारांच्या पाठपुराव्या नुसार कल्याण पूर्वेतील रस्त्यांच्या कामांना सुरवात झाली असून या कामांची पाहणी आमदार सुलभा गायकवाड यांनी केली.
श्री मलंग रोड, तसेच इतरही अनेक भागात रस्ते दुरुस्तीच्या कामांना सुरुवात झाली असून, चिंचपाडा, यू टाईप व नांदिवली येथेही लवकरच कामे सुरू होणार आहेत. त्यामुळे कल्याण पूर्व विधासभा क्षेत्रातील सर्वच रस्ते लवकरच खड्डेमुक्त होतील. प्रशासनाने जनतेच्या हिताच्या कामांकडे वेळेवर लक्ष देणे हीच खरी प्रशासनाची जबाबदारी आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे. एक लोकप्रतिनिधी म्हणून वारंवार याचा पाठपुरावा केला आहे आणि या पुढेही करत राहणार. सर्व सामान्यांना न्याय मिळवून देणे हे कर्तव्य असून ते प्रामाणिकपणे करत राहीन अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार सुलभा गायकवाड यांनी दिली.
.jpg)



Post a Comment
0 Comments