ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त सार्वजनिक वाचनालय कल्याणच्या वतीने वाचक व विद्यार्थ्यांसाठी एक आगळी वेगळी अशी मराठी स्वाक्षरी स्पर्धा आयोजित केली होती. त्याचा बक्षीस समारंभ रविवारी वाचनालयाच्या सभागृहात संपन्न झाला. प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अचिव्हर्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भिवंडीकर, स्वाक्षरी तज्ञ गोपाळ वाकोडे (बुलढाणा) गिनीज बुकात नोंद असलेले चित्रकार राजेश पवार हे उपस्थित होते. 

यावेळी डॉ. महेश भिवंडीकर आपल्या भाषणात म्हणाले की, आजकाल मराठी स्वाक्षरी करणे हे जवळजवळ सर्वच जण विसरलेले आहेत. आपली मराठी भाषा ही अमृताहुनी गोड आहे, तिला अभिजात मराठी भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे.त्यामुळे आपले कर्तव्य आहे की आपण आपले नित्य व्यवहाराची कामे मराठी भाषेतच करायला हवी. आज आपण स्वाक्षरी करताना मराठीत न करता इंग्रजीत करतो त्यासाठी विद्यार्थी आणि पालकांना आदर्शवत होईल व ते आपली स्वाक्षरी मराठीतूनच करतील या उद्देशाने सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित केलेला हा मराठी स्वाक्षरी स्पर्धेचा उपक्रम खूपच चांगला आहे. यामुळे मराठी स्वाक्षरी करण्याची बीजे पेरली जातील व येणाऱ्या काळात आपण सारे जण मराठीतून स्वाक्षरी करू असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
गोपाळ वाकोडे व चित्रकार राजेश पवार यांनी उपस्थिताना त्यांच्या नावाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्वाक्षऱ्यांचे प्रात्यक्षिक दाखविले. त्यामुळे सर्व प्रेक्षक वर्ग खुश झाले व आम्ही मराठीतून स्वाक्षरी करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ चित्रकार राजेश पवार यांनी केले. या स्पर्धेकरिता २०० वाचकांनी व ३०० शालेय विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. त्यापैकी वाचक वर्गातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सुधीर चित्ते, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक किशोर शेळके, तृतीय क्रमांकाचे पारितोषिक निलेश बिरमोळे यांना प्राप्त झाले.
शालेय विभागातून श्री गजानन विद्यालयाच्या श्रावणी येणारे यांना प्रथम पारितोषिक, शशांक महाविद्यालयाच्या प्रज्वल वाघमारे यांना व्दितीय पारितोषिक, सुभेदार वाड्याचे मितेश जाधव तृतीय पारितोषिक यांना प्राप्त झाले. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, सरचिटणीस भिकू बारस्कर, कार्यकारणी सदस्य अरविंद शिंपी व मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग तसेच वाचनालयाचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता
.jpg)




Post a Comment
0 Comments