Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अनाधिकृत फेरीवाल्यांविरुध्द केडीएमसीच्या फ आणि ग प्रभागाची संयुक्त धडक कारवाई

                    ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार डोंबिवली रेल्वे स्थानकालगतचा फ आणि ग प्रभागक्षेत्र परिसर तेथील नागरिकांसाठी पादचाऱ्यांसाठी मोकळा ठेवण्याकरिता कार्यालयीन सुट्टीच्या दिवशी शनिवारी व रविवारी  फ प्रभागाच्या सहा.आयुक्त हेमा मुंबरकर व ग प्रभागाचे सहा. आयुक्त भारत पवार यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने व  आपल्या पथकाच्या मदतीने डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील अनाधिकृत फेरीवाल्यांविरुध्द धडक कारवाई केली.



 तसेच शहराचे विद्रुपीकरण करणारे 65 छोटे मोठे बॅनर्स41 शेड्स1 गोडाऊन6 टप-याअतिक्रमण केलेले 10 ओटेदुकानदारांनी सोईनुसार अतिक्रमण करून केलेल्या पाय-या2 धोकादायक होर्डिंग्स यावर जेसीबीगॅस कटरपारहातोडा इ. सामुग्रीच्या सहाय्याने निष्कासनाची धडक कारवाई करण्यात केली. हि कारवाई यापुढेही सातत्याने सुरु राहील अशी माहिती फ प्रभागाच्या सहा.आयुक्त हेमा मुंबरकर व ग प्रभागाचे सहा. आयुक्त भारत पवार यांनी दिली आहे.


Post a Comment

0 Comments