ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण डोंबिवली मध्ये काँग्रेस पक्षाला आणखी एक धक्का बसला आहे. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतील डोंबिवली प्रभाग क्र ७३, शेलार नाका च्या नगरसेविका दर्शना शेलार व त्यांचे वडील तथा काँग्रेस डोंबिवली शहर ए ब्लॉक अध्यक्ष व माजी नगरसेवक सदाशिव शेलार यांनी काँग्रेस पक्ष सहकाऱ्यांसोबत आज मुंबई मुक्तागिरी येथे खासदार डॉ श्रीकांत शिंदे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना प्रमुख नेते तथा उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते पक्ष प्रवेश केला. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, डोंबिवली उपशहर प्रमुख गोरखनाथ म्हात्रे, युवासेना शहर प्रमुख सागर जेधे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेना मुख्यनेते, उपमुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आता अधिक मजबूत होत असून राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील मोठ्या संख्येने नागरिक संघटनेशी जोडले जात आहेत. उपमुख्यमंत्री यांच्या विकासाभिमुख कार्यप्रणालीने प्रभावित होऊन विविध पक्षातील लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, पदाधिकारी शिवसेनेशी जोडले जात आहेत.
याच पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री यांच्या मुख्य उपस्थितीत काँग्रेसचे डोंबिवली शहर पूर्व विभाग ए ब्लॉकचे अध्यक्ष, माजी नगरसेवक सदाशिव शेलार, काँग्रेसच्या माजी नगरसेविका दर्शना शेलार यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश करत हाती भगवा घेतला. यांच्यासह अजय शेलार, हिरामण मोरे, दशरथ म्हात्रे, प्रतीक शेलार, पुण्यदान सरोदे, राहुल पढाडे, मोहन भोसले, ख्वाजा शेख, सलील चौधरी, प्रसाद कीर, विशाल म्हात्रे आणि मोठ्या संख्येने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी सर्वांचे पक्षात स्वागत करून पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
.jpg)


Post a Comment
0 Comments