ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण पूर्व परिसरात अल्पवयीन मुलांच्या बेधुंद धिंगाण्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही अल्पवयीन तरुणांनी गाडीवर बसून दारूची बाटली हातात घेत नागरिकांना शिवीगाळ करत दहशत माजवली. या प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे अल्पवयीन मुलं मोटरसायकलवरून कल्याण पूर्वेतील मुख्य रस्त्यांवरून फिरत होती. त्यांच्या हातात दारूच्या बाटल्या होत्या आणि ते रस्त्याने जाणाऱ्या लोकांना गलिच्छ भाषेत शिवीगाळ करत होते. काहींनी हा संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये कैद करून सोशल मीडियावर पोस्ट केला, त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी नागरिकांनी पोलिसांकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. गर्दुल्ले गँग आणि चरसी टोळी नंतर आता या अल्पवयीन तळीरामानी परिसरातील शांतता भंग केली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक रहिवाशांनी संबंधित मोटरसायकल मालक तसेच या अल्पवयीन मुलांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. पोलिसांकडून व्हिडिओच्या आधारे मुलांचा शोध घेतला जात असल्याची माहिती मिळत आहे.
.jpg)


Post a Comment
0 Comments