Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

फेस्कॉम मुंबई जेष्ठ नागरिकांचे अधिवेशन

 

                   ब्लॅक अँड व्हाईट मुंबई वृत्तसेवा 

महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) मुंबई प्रादेशिक विभागाचे ८ वे द्वैवार्षिक अधिवेशन ७ नोव्हेबर २०२५ रोजी विष्णूदास भावे नाट्यगृह वाशी येथे सकाळी ९ तें २ या  वेळात संपन्न होणार आहे. या अधिवेशनासाठी महाराष्ट्रातील व भारतातील ज्येष्ठ  मान्यवर नागरिक उपस्थित राहणार आहेत.  अधिवेशनाचा विषय -ज्येष्ठ नागरिकांचे आंनदी जीवन व आरोग्य त्यावेळेस स्मरणिका छापण्यात येणार आहे. या मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी लागणारी आवश्यक माहिती व काही उपयुक्त लेखन छापण्यात येणार आहे.

या अधिवेशनात अभिनेते "सुख म्हणजे नक्की काय असते "  फेम  मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय अभिनेते,  विनोदी कलाकार श्री.  प्रशांत  दामले यांना,  फेस्कॉम मुंबई  प्रादेशिक विभागाच्या या  अधिवेशनात जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. श्री. प्रशांत  दामले यांनी २०१६ साली  फेस्कॉम मुंबई प्रादेशिक विभागाला रु. ५ लाख अशी भरघोस  देणगी  फेस्कॉम च्या विविध उपक्रमांसाठी दिली होती.फेस्कॉम मुंबई अध्यक्ष सुरेश ईश्वर पोटे यांनी कळवले आहे.

Post a Comment

0 Comments