शासनाचा निर्णयच धाब्यावर बसवल्याचा आरोप
ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली वार्ताहर
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने निवडणूकीची अंतिम प्रभाग रचना जाहीर केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या नवीन प्रभाग रचनेला तीव्र विरोध केला आहे.
मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी महानगरपालिका प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि आरोप केला की "कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सत्ताधारी पक्षाच्या इशाऱ्यावर काम करत आहे."
"शासनाच्या जीआर विरुद्ध पालिका प्रशासन काम करते आहे."
राज्यप्रशासनाने प्रभाग रचनेसंबंधी जे निर्देश दिले होते त्याच्या विरुद्ध जाऊन ही प्रभाग रचना करण्यात आली आहे",
त्याच बरोबर त्यांनी सांगितले की प्रभाग रचना पूर्णपणे सत्ताधारी पक्षाच्या हिताची आहे. मनसे या प्रभाग रचनेविरुद्ध ठामपणे उभे राहील आणि न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, शहर अध्यक्ष राहुल कामत, निषाद पाटील, योगेश पाटील, माजी नगरसेवक प्रभाकर जाधव, अरुण जांभळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
.jpg)



Post a Comment
0 Comments