Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट संस्था पुरस्काराने स्टडी व्हेवज बहुउद्देशीय संस्था सन्मानित

             

                      ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

ज्या महामातांनी समाज जागृतीच्या कार्यात सक्रीय सहभाग देऊन देशामध्ये ज्ञानज्योत प्रज्वलित केली, त्यांचा अजरामर इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचावा या उदात्त हेतूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन समिती (अंतर्गत) तर्फे बहुजन महामाता जनजागृती महोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट संस्था पुरस्कार 2025 या पुरस्काराने स्टडी व्हेवज बहुउद्देशीय संस्था कल्याण पूर्व सन्मानित करण्यात आले.

या महोत्सवांतर्गत विविध विषयांवर व्याख्याने, तसेच समाजातील परिवर्तनशील विचार अधोरेखित करणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. या कार्यक्रमास उपस्थित राहून मान्यवरांशी आणि उपस्थितांसोबत संवाद साधण्याची संधी संस्थेला मिळाली. अशा उपक्रमांमुळे समाजातील जनजागृतीची परंपरा अधिक बळकट होत असून पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरत असल्याची प्रतिक्रिया स्टडी व्हेवज बहुउद्देशीय संस्थेचे उमाकांत चौधरी यांनी दिली. 


Post a Comment

0 Comments