Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

डोंबिवलीत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

  

                ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली वार्ताहर 

डोंबिवली पूर्वेतील एकता नगर मधील समाज सेवक आणि माजी नगर सेवक श्री राजन मराठे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी , आणि माजी नगरसेविका सौ.ज्योती मराठे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन कल्याण डोंबिवलीचे खासदार माननीय श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते नवरात्रीच्या शुभकाळात  करण्यात आले.त्याप्रसंगी शिवसेनेच्या हजारो कार्यकर्त्यांची आणि परिसरातील नागरिकांची गर्दी लोटली होती.



ह्या कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.खासदारांनी श्री राजन मराठे यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.

परिसरातील असंख्य नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने उपस्थित राहून येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत राजन मराठे यांना पाठिंबा एकप्रकारे जाहीर केला असल्याचे चित्र दिसून आले.

Post a Comment

0 Comments