एंडोस्कोपिक एंडोनासल पिट्यूटरी ग्लँड ट्यूमर एक्सिजन सर्जरी करून पाच जणांना जीवदान
हाईलँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. चंद्रनाथ तिवारी यांनी पाच रुग्णांच्या मेंदूतील ट्युमर काढून त्यांना जीवनदान दिले. नाकावाटे ट्युमर काढून दृष्टी परत मिळवून दिली – ही एक कमी आक्रमक शस्त्रक्रिया पद्धत आहे. यामध्ये शरीराला कमीत कमी इजा होते. कारण पारंपारिक खुल्या शस्त्रक्रियेच्या तुलनेत लहान छेद (कट्स) केले जातात किंवा अजिबात छेद केले जात नाहीत.
“दरवर्षी भारतात सुमारे दहा लाख लोक पिट्यूटरी ॲडेनोमा या आजाराने त्रस्त होतात. यामुळे डोकेदुखी व दृष्टी कमी होणे अशी लक्षणे दिसतात,” डॉ. चंद्रनाथ तिवारी.
ब्लॅक अँड व्हाईट ठाणे (मीनल पवार)
ठाणे येथील हायलँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अलीकडेच पाच रुग्णांच्या नाकातून ब्रेन ट्यूमर काढून टाकत त्यांना "जीवनदान" दिले. ज्याला एंडोस्कोपिक एंडोनासल पिट्यूटरी ग्लँड ट्यूमर एक्सिजन सर्जरी म्हणतात. या प्रक्रियेद्वारे रुग्णांची हरवलेली दृष्टी पुन्हा मिळवून देण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी फक्त न्यूरोसर्जनच नव्हे तर नेत्रतज्ज्ञ आणि ईएनटी सर्जन यांची देखील आवश्यकता असते. हायलँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हे सर्व तज्ञ एकाच छताखाली उपलब्ध असल्यामुळे ही शस्त्रक्रिया करणे अत्यंत सुलभ ठरले. परिणामी रुग्णांची दृष्टी परत मिळाली तसेच कानाशी संबंधित समस्याही दूर करण्यात आल्या.
पिट्यूटरी ग्रंथी ट्यूमर, ज्याला पिट्यूटरी एडेनोमा म्हणूनही ओळखले जाते. हा भारतात आढळणाऱ्या सामान्य ब्रेन ट्यूमरपैकी एक आहे. भारतात दरवर्षी पिट्यूटरी एडेनोमाचे १० लाखांहून अधिक रुग्ण आढळतात. पिट्यूटरी एडेनोमा सामान्यतः दृष्टी बदलणे आणि डोकेदुखीशी संबंधित असतात. म्हणून, कोणीही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, वैद्यकीय सल्ल्यासाठी त्वरित न्यूरोलॉजिस्ट किंवा न्यूरोसर्जनचा सल्ला घ्यावा. जरी अनेक प्रकरणांमध्ये लवकर निदान करणे कठीण असले तरी, आता पूर्वीसारखे राहिलेले नाही. पिट्यूटरी ग्रंथी ट्यूमर आता औषधे आणि प्रगत तंत्रज्ञानाने बरे करता येतात.
भारतातील आघाडीचे न्यूरोसर्जन आणि सल्लागार हाईलँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. चंद्रनाथ तिवारी सांगतात, "पिट्यूटरी एडेनोमा हे तुलनेने सामान्य आहेत. जे सर्व ब्रेन ट्यूमरपैकी सुमारे १०-१५ टक्के असतात. या ट्यूमरचे आकारमान आणि स्थानानुसार विविध लक्षणे निर्माण करू शकतात. ज्यामध्ये हार्मोनल असंतुलन, डोकेदुखी आणि दृष्टी समस्या यांचा समावेश आहे. एंडोस्कोपिक एंडोनासल पिट्यूटरी ट्यूमर एक्सिजन सर्जरी ही ट्यूमर काढून टाकण्यासाठी एक पसंतीची पद्धत आहे. कारण ती कमीत कमी आक्रमक असते. या प्रक्रियेत आपल्याला कवटी उघडण्याची आवश्यकता नाही त्यामुळे गुंतागुंतीचा धोका कमी होतो. रुग्णाच्या बरे होण्याचा कालावधी जलद होतो.”
डॉ. चंद्रनाथ तिवारी पुढे म्हणाले, "पिट्यूटरी ग्रंथीचे ट्यूमर सहसा आपोआप होतात आणि वारशाने मिळत नाहीत. हे कोणालाही, कधीही आणि कोणत्याही वयात होऊ शकते. ट्यूमरच्या वाढीचे नेमके कारण अज्ञात आहे. जवळजवळ सर्व पिट्यूटरी एडेनोमा ही पिट्यूटरी ग्रंथीमध्ये कर्करोग नसलेली, असामान्य वाढ असते. अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मते, पिट्यूटरी एडेनोमासाठी कोणतेही कारणात्मक जीवनशैलीशी संबंधित किंवा पर्यावरणीय घटक नाहीत. या पद्धतीने उपचार पूर्ण झाल्यानंतर, डॉक्टरांना रुग्णाच्या प्रकृतीवर महिने- वर्षानुवर्षे लक्ष ठेवावे लागते. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची नियमितपणे न्यूरोसर्जनकडून तपासणी केली जाते. रुग्णाने थकवा, पचनसंस्थेतील त्रास, पित्ताशयातील खडे किंवा दृष्टीसमस्या यांसारख्या लक्षणांबाबत डॉक्टरांशी चर्चा करणे महत्त्वाचे असते.”
हायलँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने या किमान आक्रमक प्रक्रियेचा वापर करून पाच वेगवेगळ्या रुग्णांवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केली असून सध्या सर्व रुग्णांची प्रकृती उत्तम आहे.
डॉ. चंद्रनाथ तिवारी म्हणाले, “पिट्यूटरी ग्रंथी ही मेंदूतील ‘मास्टर ग्लँड’ आहे. जी हायपोथॅलामसच्या तळाशी आणि डोळ्यांच्या मागे स्थित असते. ही मटरासाख्या आकाराची ग्रंथी आहे. जी हायपोथॅलामससोबत हातमिळवणी करून शरीराच्या आवश्यक कार्यांना नियंत्रित करते. पिट्यूटरी ग्रंथी इतर ग्रंथींचे नियंत्रण करते आणि संपूर्ण शरीरातील हार्मोनल संतुलन राखते. याप्रकारे, पिट्यूटरी ग्रंथी वाढ, विकास आणि प्रजनन यासाठी जबाबदार आहे. शरीरातील महत्त्वाच्या अवयवांचे कार्य नियंत्रित करते. जसे की मूत्रपिंड, स्तन, आणि महिलांमध्ये गर्भाशय. पिट्यूटरी ग्रंथी नसल्यास शरीरातील पाणी संतुलन, रक्तदाब, ऊर्जा संतुलन, तापमान नियंत्रण, प्रजनन कार्य आणि चयापचय बिघडू शकतो. त्यामुळे पिट्यूटरी ग्रंथी आपल्याला निरोगी जीवन जगण्यास मदत करते.”
डॉ. चंद्रनाथ तिवारी यांनी निष्कर्ष दिला की, “पिट्यूटरी ग्रंथीतील ट्युमर साधारणपणे हळू वाढणारे आणि सौम्य असतात. म्हणजे ते स्थानिक राहतात आणि शरीराच्या इतर भागात पसरत नाहीत. दुसरीकडे, पिट्यूटरी कॅरिनोमा (neuroendocrine ट्युमर) हे दुर्मिळ, आक्रमक, कर्करोगजन्य (malignant) असून शरीराच्या इतर भागात पसरतात. जसे पिट्यूटरी ॲडेनोमा वाढतात, ते आसपासच्या रचना, जसे की डोळ्यांना मेंदूशी जोडणारे नसे, दाबू शकतात. या “mass effect” मुळे प्रभावित अवयवांशी संबंधित लक्षणे दिसू शकतात. जसे की या प्रकरणात दृष्टीतील बदल. मोठ्या पिट्यूटरी ॲडेनोमा (pituitary macroadenomas) नैसर्गिक पिट्यूटरी पेशींवर दाब टाकू शकतात आणि त्यांच्या नियामक क्रियांमध्ये बदल करू शकता.
.jpg)


Post a Comment
0 Comments