
ब्लॅक अँड व्हाईट अंबरनाथ वार्ताहर
मा. मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांचे मार्गदर्शनाने आज दि. 24-9-2025 रोजी अंबरनाथ नगरपरिषद व ITI कॉलेज यांच्या संयुक्त विद्यामानाने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता ही सेवा मोहीम राबविण्यात आली असताना गोविंद पुल ते स्मशानभूमी (पूर्व) रस्त्याची साफसफाई करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार स्वच्छ भारत हरित भारत हरित प्रतिज्ञा घेण्यात आली.
त्यातून शहर स्वच्छ ठेवण्याचा व पर्यावरण संरक्षण चा संदेश देण्यात आला. यावेळी आरोग्य खातेप्रमुख राजेश शिंदे, उपखातेप्रमुख संदिप खोजे, स्वच्छता निरीक्षक महेश जाधव व जयंत कल्याणकर आणि १०० ते १५० विद्यार्थांसह प्राचार्य व प्राध्यापक वर्ग आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
.jpg)



Post a Comment
0 Comments