Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

केडीएमसी आयुक्त आणि माजी आमदारांमध्ये रंगला बुद्धिबळाचा सामना


बुद्धिबळ स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक

क्षमतेचा व एकाग्रतेचा विकास होण्यास

मदत होते

- केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल


                   ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

बुद्धिबळ स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा व एकाग्रतेचा विकास होण्यास मदत होते त्यामुळे जास्तीत जास्त शाळांनी,विद्यार्थ्यांनी बुद्धिबळ स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदवावा असे प्रतिपादन कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी केले. क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे  आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन जे ए ई एस इंग्लिश हायस्कुल, जोशी बाग, कल्याण (प) येथे करण्यात आले होते, या बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले.

 

या बुद्धिबळ स्पर्धेचा उद्घाटन सामना महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या विरुद्ध माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यामध्ये रंगला. या सामन्यानंतर  आयुक्त अभिनव गोयल यांनी स्वतः उपस्थित खेळाडूंना, बुद्धिबळपटूंना भेट देऊन खेळासाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षण विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी खेळाडूंचा आढावा घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये U/ 14,17, व 19 या वयोगटातील एकूण 1545 खेळाडूंनी  सहभाग नोंदवला असून हि स्पर्धा दोन दिवस सुरू राहणार आहे. या स्पर्धा संघटनेच्या अधिकृत पंचांच्या माध्यमातून घेण्यात आल्या.    

यावेळी क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त संजय जाधव, क्रीडा पर्यवेक्षक प्रविण कांबळे, संतोष पाटील तसेच संस्थेचे पदाधिकारी, संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिका खेळप्रमुख योगेश सावंत,  क्रीडा समिती सदस्य कृष्णा बनगर, डॉ विजय सिंग, डॉ बागराव, गजानन वाघ, सहभागी शाळांचे क्रीडा शिक्षक तसेच शिक्षण व क्रीडा विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments