Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याण पूर्वेत स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून “माझा कचरा माझी जबाबदारी”चा नागरिकांना संदेश

                   ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात “स्वच्छता ही सेवा अभियान” १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर  या कालावधीत राबविण्यात येत असून त्याअंतर्गत आज ड प्रभाग परिसरात चक्कीनाका ते बिकानेर बेकरी (मलंग रस्ता) येथे सखोल स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले.

या मोहिमेस आमदार सुलभा गायकवाड, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त  प्रसाद बोरकर, ड प्रभागाचे सहा. आयुक्त  उमेश यमगर, मुख्य स्वच्छता अधिकारी ऑगस्टीन घुटे, स्वच्छता अधिकारी विक्रम गायकवाड, रचना पार्क ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मनोहर देसाई व प्रधान, तसेच ज्येष्ठ नागरिक, चेतना शाळेचे विद्यार्थी, सुमित एल्कोचे आयईसी पथक, अधिकारी-कर्मचारी व इतर मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

महापालिकेच्या स्वच्छता विभागाने या मोहिमेदरम्यान रस्ते व फुटपाथ काटेकोर स्वच्छता, झाडलोट, कचरा गोळा करून योग्य विल्हेवाट या सर्व बाबींवर विशेष भर दिला. नागरिकांना अधिक स्वच्छ व निरोगी वातावरण मिळावे यासाठी कर्मचारी वर्गाने मनापासून मेहनत घेतली. तसेच नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी “माझा कचरा माझी जबाबदारी” या संकल्पनेवर आधारित पथनाट्यही सादर करण्यात आले. नागरिकांनी दररोज घंटागाडीत कचरा देणे, व्यावसायिकांनी दुकानात कचरा डबे ठेवणे, रस्त्यावर कचरा न टाकणे याबाबत आवाहन करण्यात आले.

महापालिका सातत्याने शहरातील रस्ते व गल्लींची स्वच्छता प्रभावी पद्धतीने राखण्यासाठी कटिबद्ध आहे. स्वच्छता ही केवळ जबाबदारी नसून सामाजिक बांधिलकी आहे. या अभियानाद्वारे नागरिकांचा सहभाग वाढून स्वच्छ, निरोगी व सुंदर कल्याण-डोंबिवली घडविण्यात निश्चितच यश मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.


Post a Comment

0 Comments