Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त रिजन्सी अनंतम् येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

 

           ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली (विद्या कुलकर्णी)

रिजन्सी अनंतम् डोंबिवली पूर्व येथे डोंबिवलीचे मानबिंदू आदरणीय मा. श्री.रविंद्रजी चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त श्री.महेशजी पाटील व क.डों.म.पा .यांच्या सहकार्याने दि.20/9/2025 व 21/9/2025ह्या दोन दिवशी  सकाळी 10ते 4 वाजेपर्यंत आरोग्य सेवा दिवस म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. त्याच अनुषंगाने या आरोग्य शिबिराला माननीय रविंद्र चव्हाण यांनी प्रत्यक्ष भेट दिली व त्यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी श्री.महेश पाटील,श्री शरद शाहू व इतर मान्यवरांच्या हस्ते त्यांना अक्षरगणेशाची चित्राकृती सस्नेह भेट म्हणून देण्यात आली.


 रिजन्सी अनंतम् संकुलात एखादे आरोग्य केंद्र व्हावे यासाठी नागरिकांकडून विनंती केली गेली.त्यावेळी माननीय रवींद्र चव्हाण यांनी देखील त्याला प्रतिसाद देत संकुलामध्ये आरोग्य केंद्र तसेच जेनेरिक औषधांसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या माध्यमातून प्रयत्न करू असे आश्वासन दिले.

या शिबिरात नागरिकांच्या विविध आजारांची मोफत तपासणी करण्यात आली.ELPIZO या सुपर स्पेशालीटी हॉस्पिटलतर्फे  नामांकित डॉक्टरांकडून मार्गदर्शन  ,ECG, Blood pressure, Blood sugar,pulse ,यांची मोफत तपासणी करण्यात आली.इतर रक्त तपासण्या अत्यल्प दरात उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यासाठी डॉ.संदीप इंगळे,डॉ.चंद्रसेन शेळके,डॉ.माणिक एल्माने तसेच भूषण घोडेगांवकर,हेमलता महाजन व इतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

  

  रिजन्सी अनंतम् मधील शरद शाहू, सुभाष वाळवे,  अरविंद कदम,डॉ.विजय कुमार देवरे,विद्या कुलकर्णी,शाम लाड ,संतोष नाईक,अजित ठाकूर,अजित जाधव,नंदलाल परब,नवरंग वारंग,मोहन कदम,यादव,पाटील यांनी आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला.

Post a Comment

0 Comments