Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

डोंबिवलीत रंगणार रासरंग शारदीय नवरात्र उत्सव डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ, डोंबिवली यांचा उपक्रम

                        ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे  खासदार  डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या  संकल्पनेतून साकार झालेला रासरंग – शारदीय नवरात्र उत्सव यावर्षी १० व्या वर्षात पदार्पण करत असून २२ सप्टेंबर  ते १ ऑक्टोबर  या कालावधीत दररोज सायंकाळी डी.एन.सी. रोडवरील शाळेच्या मैदानावर भव्यदिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. २०१७ पासून डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ, डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने या उत्सवाचे आयोजन होत आहे.

सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्राशी निगडीत उपक्रम राबवणारे हे फाऊंडेशन सर्वसामान्य जनतेसाठी सेवाभावी कार्य करत असून, त्यातील एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे हा रास रंग नवरात्र उत्सव आहे. या नवरात्र उत्सवाचा उद्घाटन सोहळा कल्याण लोकसभा मतदारसंघाचे  खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते तसेच कल्याण ग्रामीण विधानसभेचे आमदार  राजेश मोरे आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख  गोपाळ लांडगे तसेच अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत २२ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता नऊ रंगी फुगे आसमंतात सोडून करण्यात येणार आहे. दररोज रात्री ८:३० वाजता विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या महिलांचा नवदुर्गा पुरस्काराने सन्मानउपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.


  प्रसिद्ध तबलावादक व संगीतकार नैतिक नागदा यांच्या ऑर्केस्ट्राद्वारे दांडिया-गरबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.  डॉया शारदीय नवरात्र उत्सवात जास्तीत जास्त दुर्गाभक्त, युवक-युवती, महिला आणि गरबा-प्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ, डोंबिवली यांच्यावतीने  पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments