ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
संत निरंकारी मिशनच्या डोंबिवली झोन अंतर्गत शहापूर शाखा आणि के.बी.हाजी बच्चूअली चॅरिटेबल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने संत निरंकारी सत्संग भवन, गोठेघर, शहापूर या आदिवासी भागात मागील रविवारी मोफत नेत्रतपासणी शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात २८७ जणांची नेत्रतपासणी करण्यात आली. त्यात ३२ मोतीबिंदूचे रुग्ण आढळले, या रुग्णांना के बी हाजी बच्चूअली चॅरिटेबल हॉस्पिटल येथे मोफत शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले. त्यापैकी आतापर्यंत १० जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली.
या व्यतिरिक्त १०८ व्यक्तींना चष्मे वाटण्यात आले तर उर्वरित नेत्ररुग्णांना मोफत औषधोपचार देऊन डोळ्यांची निगा राखण्यासाठी तज्ञ डॉक्टरांकडून आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
या शिबिराला शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे यांनी सदिच्छा भेट दिली. उपस्थित मान्यवरांनी मिशनच्या मानवतावादी कार्याचे कौतुक केले. मिशनच्या समाज कल्याण विभागाच्या प्रेमा ओबेरॉय यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. मिशनच्या शहापूर शाखेचे मुखी शैलेश सपकाळे यांच्या देखरेखीखाली सेवादल सदस्यांनी हे शिबीर पार पाडण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
.jpg)





Post a Comment
0 Comments