ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली (विद्या कुलकर्णी)
उदय शिक्षण प्रसारक मंडळाच्या ज्ञान मंदिर विद्यासंकुलातील के.रा. कोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, डोंबिवली " सृजन २०२५ "या विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देणाऱ्या उपक्रमाची सुरुवात दिनांक १८/०९/२५रोजी विज्ञान प्रदर्शन व दिनांक १९/0९/ २५ रोजी वाणिज्य ,कला( आर्ट्स आणि क्राफ्ट्स) भूगोल, मराठी, इंग्रजी या विषयांच्या वैविध्यपूर्ण प्रतिकृतींच्या प्रदर्शनाने झाली.
विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन उदय शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य श्री किशोर येवला, मुख्याध्यापिका सौ.संगीता पाखले व परीक्षक यांच्या हस्ते करण्यात आले. तर वाणिज्य व कला शाखेचे उद्घाटन डोंबिवली महिला महासंघाच्या अध्यक्षा सौ जयश्री कर्वे , मुख्याध्यापिका सौ.संगीता पाखले व इतर सर्व उपस्थित परीक्षक मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या तब्बल 346 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणारे ,त्यांच्यात आत्मविश्वास जागवणारे, त्यांच्या कलागुणांना वाव देणारे असे अनेक प्रोजेक्ट या प्रदर्शनात विद्यार्थ्थांनी सादर केले.. विज्ञान शाखेच्या प्रयोगांचे परीक्षण सौ.केतकी देशपांडे ,सौ.नीलिमा भारंबे, सौ.अर्चना मराठे व श्री. गजेंद्र देसले यांनी केले. वाणिज्य शाखेच्या प्रयोगांचे परीक्षण सौ. जयश्री कर्वे व सौ.वीणा आचार्य यांनी केले. कला व भूगोल या विषयांच्या प्रयोगांचे परीक्षण श्री दिगंबर बेंडाळे, श्री गवारी सर,व स्वामी विवेकानंद विद्यामंदिर माजी मुख्याध्यापिका सौ विद्या कुलकर्णी यांनी केले.मराठी व इंग्रजी या विषयांचे परीक्षण सौ.ऋतुजा केळकर व सौ.नेहा जोशी यांनी केले.सर्व परीक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत मार्गदर्शन केले व परीक्षणाचा आनंद घेतला.
सदर प्रदर्शनाचा लाभ प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्वच विद्यार्थ्यांनी व पालकांनी घेतला.के. रा. कोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ संगीता पाखले यांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे मनोबल, अभ्यासातील रुची व त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास पूरक अशा उपक्रमांचे आयोजन आम्ही करत असतो.हे उपक्रम शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळेच यशस्वी होतात.असे त्यांनी नमूद केले.
.jpg)






Post a Comment
0 Comments